pimpari-legislative assembly session | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहात पिंपरीची पाटी कोरीच 

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडची पाटी पहिल्या आठवड्यात कोरीच राहिली आहे. दुसऱ्या आठवड्याची सुरवातही गोंधळाने झाली. पूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब झाले. त्यामुळे या आठवड्यातही पिंपरीतील लक्षवेधी वा ताराकिंत प्रश्‍न येईल की नाही, याविषयी शंका आहे. मात्र,या आठवड्यात लक्षवेधी व ताराकिंत प्रश्‍नही लागतील, असा विश्‍वास शहरातील तीनपैकी दोन आमदारांनी व्यक्त केला आहे. 

पिंपरीः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडची पाटी पहिल्या आठवड्यात कोरीच राहिली आहे. दुसऱ्या आठवड्याची सुरवातही गोंधळाने झाली. पूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब झाले. त्यामुळे या आठवड्यातही पिंपरीतील लक्षवेधी वा ताराकिंत प्रश्‍न येईल की नाही, याविषयी शंका आहे. मात्र,या आठवड्यात लक्षवेधी व ताराकिंत प्रश्‍नही लागतील, असा विश्‍वास शहरातील तीनपैकी दोन आमदारांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या हिवाळी अधिवेशनातही शहरातील एकही महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागला नव्हता. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे शहरातील आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांना नागपूर येथील विधानभवनाबाहेर पक्षाच्या इतर आमदारांना घेऊन आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करण्याची पाळी आली होती. यावेळीही ती वेळ येण्याची शक्‍यता दिसत आहे. त्याला ऍड. चाबुकस्वार यांनीही दुजोरा दिला. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस गोंधळातच गेले. त्यानंतर पहिल्या सप्ताहात पिंपरीची पाटी कोरीच राहिली. आता दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवसही वाया गेला आहे. नंतर राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे तसेच त्यावरील चर्चेमुळे शहरातील प्रश्‍न पुन्हा प्रलंबित राहणार, अशीच चिन्हे आहेत. 

शहरात सत्ताधारी भाजपचे दोन (त्यातील एक सहयोगी) आणि शिवसेनेचे एक असे तीन आमदार आहे. त्या प्रत्येकाने शहराला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्‍नी एकेक लक्षवेधी यावेळी दिली आहे. त्या यापूर्वीच्याच नव्हे, तर गेल्या कित्येक अधिवेशनात दिल्या गेल्या होत्या. पण पटलावर आल्याच नाहीच.त्यामुळे साडेबारा टक्के, शास्तीकर, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असे ज्वलंत प्रश्‍न गेली कित्येक वर्षे तसेच राहिले आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहरातील तिन्ही आमदार सत्ताधारी असूनही हे प्रश्‍न सुटलेले नाहीत. खरे, तर त्यांनी लक्षवेधी वा ताराकिंत प्रश्‍न देण्याऐवजी आपलेच संबंधित मंत्री वा सचिवांना भेटून ते एव्हाना मार्गी लावले असते, असे जाणकारांचे मत आहे. 

तिन्ही आमदारांनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, साडेबारा टक्के परतावा आणि शास्तीकर माफीचा प्रश्‍न पुन्हा मांडलेला आहे. गेल्या अधिवेशनातही ते मांडले होते. यावेळी साडेबारा टक्के आणि शास्तीकरावरील लक्षवेधी लागण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र,वाहतूकप्रश्‍नावरील लक्षवेधी या सप्ताहात लागेल,अशा विश्‍वास भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी व्यक्त केला. 

मेट्रोचा विस्तार करण्यासाठी दिलेली लक्षवेधी लागेल, यासाठी प्रयत्नशील राहू, असे भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे यांनी सांगितले. 

गेल्या अधिवेशनातच नव्हे, तर साडेतीन वर्षात लक्षवेधी लागलेल्या नाहीत. ताराकिंत प्रश्‍न पटलावर आले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातीलच (पिंपरी) नव्हे,तर संपूर्ण शहराला भेडसावणारे शास्तीसारखे प्रश्‍नी आता चर्चेची मागणी करणार असल्याचे शहरातील तिसरे आणि शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार म्हणाले.

संबंधित लेख