पिंपरी पालिकेच्या सभा स्थगितीची उद्या हॅटट्रिक होणार का? 

भाजप प्रथमच सत्तेत आल्यानंतर 15 महिन्यांत पिंपरी-चिंचवड महापालिकेची मासिक सभा तब्बल 19 वेळा तहकूब झालेली आहे. परिणामी नवे सत्ताधारीही गत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मार्गावर जाऊ लागल्याची टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता सभा स्थगित न करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, राष्ट्रीय संत व मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्र्यांचा दर्जा दिलेले भय्यू महाराज यांच्या निधनामुळे पुन्हा उद्याची सर्वसाधारण सभा तहकूब झाली नाही, तरच हा निर्णय सत्यात उतरला जाणार आहे.
पिंपरी पालिकेच्या सभा स्थगितीची उद्या हॅटट्रिक होणार का? 

पिंपरीः भाजप प्रथमच सत्तेत आल्यानंतर 15 महिन्यांत पिंपरी-चिंचवड महापालिकेची मासिक सभा तब्बल 19 वेळा तहकूब झालेली आहे. परिणामी नवे सत्ताधारीही गत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मार्गावर जाऊ लागल्याची टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता सभा स्थगित न करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, राष्ट्रीय संत व मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्र्यांचा दर्जा दिलेले भय्यू महाराज यांच्या निधनामुळे पुन्हा उद्याची सर्वसाधारण सभा तहकूब झाली नाही, तरच हा निर्णय सत्यात उतरला जाणार आहे. 

दरम्यान, उद्याची सभा तहकूब झाली,तर ती तहकुबीची हॅटट्रिक होणार आहे. मागील महिन्याची सभा एका नगरसेविकेच्या पतीच्या निधनामुळे या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. तर, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे 11 चीही सभा उद्यापर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. त्यात या महिन्याचीही सभा उद्या आहे. त्यामुळे दोन सभांचे कामकाज उद्या होणार आहे. परिणामी त्या स्थगित करणे हे सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही. अगोदरच सभा स्थगिती सत्रामुळे कामकाज होत नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. भय्यू महाराजांना श्रद्धांजली वाहून काही मिनिटे उद्याची सभा स्थगित केली जाईल. त्यानंतर ती पुन्हा सुरू होईल,असे समजते. उद्याची सभा मागच्यासारखी तहकूब केली जाणार नाही, याला पालिका सभागृहनेते एकनाथ पवार यांनीही "सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. 

गेल्या सव्वा वर्षात पालिका सभा 19 वेळा स्थगित झाली आहे. मात्र, पालिकेच्या खजिन्याची चावी असलेली स्थायी समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. स्थायी सभा ही पालिका सभेप्रमाणे वारंवार तहकूब होत नाही, यामागे काय गुपित आहे, याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात आहे. 

दरम्यान, पालिका सभेचे पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष असणारे महापौर बदलाच्या हालचालींना आणखी वेग आला आहे. त्यामुळे विद्यमान महापौर नितीन काळजे यांची अध्यक्ष म्हणून ही सभा शेवटची असेल, असा अंदाज आहे. त्यांचा सव्वावर्षाचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात दोनजणांना महापौर करायचे झाल्यास भाजप दुसऱ्या ओबीसी नगरसेवकाला महापौरपदी संधी देईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com