पिंपरीत सत्ताधारी भाजपची माघार, पालिका सभा स्थगित 

चारपट पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावामुळे कोंडीत सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आजची पालिका सभाच स्थगित करण्याची पाळी आली. या विषयाला पालिकेतील विरोधी पक्षांनी तसेच भाजपच्याही सात नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यावरून सभेत मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता होती. त्याची चुणूक राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी काळी साडी नेसून केलेल्या निषेधातून आला. तसेच त्यांनी महापौरांच्या आसनासमोर तांब्या घेत पाणीपट्टीला विरोध करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे श्रद्धांजली वाहून तीन मिनिटातच सभा गुंडाळण्यात आली.
पिंपरीत सत्ताधारी भाजपची माघार, पालिका सभा स्थगित 

पिंपरीः चारपट पाणीपट्टी वाढीच्या प्रस्तावामुळे कोंडीत सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आजची पालिका सभाच स्थगित करण्याची पाळी आली. या विषयाला पालिकेतील विरोधी पक्षांनी तसेच भाजपच्याही सात नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यावरून सभेत मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता होती. त्याची चुणूक राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी काळी साडी नेसून केलेल्या निषेधातून आला. तसेच त्यांनी महापौरांच्या आसनासमोर तांब्या घेत पाणीपट्टीला विरोध करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे श्रद्धांजली वाहून तीन मिनिटातच सभा गुंडाळण्यात आली. 

सभा स्थगित केल्यामुळे शहराच्या नव्या कारभाऱ्यांची (स्थायी समिती सदस्य) निवडही तोपर्यंत लांबणीवर पडली आहे. पाणीपट्टी दरवाढीवरून पालिका सभेत गोंधळ होण्याची शक्‍यता सरकारनामाने काल (ता.19) दिलेल्या वृत्तात वर्तविली होती. ती खरी ठरली. मात्र, त्याची चुणूक दिसताच पुढे होणारा राडा मात्र टळला. 

दरम्यान, कुठलेही खास कारण न देता आजची सभा तहकूब केल्याने खवळलेल्या विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतरही भाजपने शहरातील एकही प्रश्‍न सोडविला नाही. त्यामुळे त्यांच्या पालिकेतील पदाधिकारी व शहरातील आमदारांनी शहरवासियांची माफी मागून राजीनामे द्यावेत, असे विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले. 

सभा सुरू होण्यापूर्वीच वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यासाठी "मनसे'ने पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर उग्र आंदोलन केले. त्यात शिवसेना, राष्ट्रवादीही सामील झाली. त्यातून सभागृहात विरोधकांचा होणारा नूर सत्ताधारी भाजपच्या लक्षात आला.त्यामुळे या विषयावरून कोंडीत सापडलेल्या भाजपने आठवडाभरासाठी त्यातून आपली सुटका करून घेतली. दरम्यान, पाणीपट्टीचा नवा प्रस्ताव (कमी केल्याचा वा पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा) प्रशासन घेऊन येण्याची शक्‍यता आहे. 

पाणीपट्टीत चौपट आणि पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढीचा विषय आजच्या सभेच्या अजेंड्यावर होता. त्याला सत्ताधारी भाजपच्या दहा टक्के नगरसेवकांसह सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे हा विषय मंजूर होण्याची शक्‍यता कमीच होती. तसेच त्यावरून सभेत गोंधळ होईल, असाही अंदाज होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com