पिंपरी पालिकेची उद्याची सभा वादळी ? 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची या महिन्याची उद्या (ता.20) होणारी मासिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. हे वादळ सभागृहात नव्हे, तर सभागृहाबाहेर येणार आहे. सभेच्या अजेंड्यावरून नव्हे, तर भलत्याच विषयावरून हा गोंधळ होण्याचे संकेत मिळाले आहेत.
पिंपरी पालिकेची उद्याची सभा वादळी ? 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची या महिन्याची उद्या (ता.20) होणारी मासिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. हे वादळ सभागृहात नव्हे, तर सभागृहाबाहेर येणार आहे. सभेच्या अजेंड्यावरून नव्हे, तर भलत्याच विषयावरून हा गोंधळ होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

सभेत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा दावा करीत पालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि आक्रमक नगरसेवक दत्ताकाका साने हे उद्याच्या सभेत माईक असलेला खासगी स्पीकर घेऊन जाणार आहेत. तशा परवानगीचे पत्र त्यांनी महापौर नितीन काळजे यांनाही दिले आहे. मात्र, त्याला उत्तर मिळालेले नाही. सभेत सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पीठासीन अधिकारी तथा सभाध्यक्ष असलेल्या महापौरांची आहे. त्यामुळे साने यांना त्यांनी मागितलेली परवानगी मिळणे अवघड दिसते आहे. परवानगी दिली, तर त्यातून विरोधकांचा आवाज दाबला जात होता, याला दुजोरा मिळणार आहे. त्यामुळे 18 हजार रुपयांचा हा स्पीकर सभागृहात घेऊन जाण्यास विरोधी पक्षनेत्यांना अटकाव केला जाण्याचीच शक्‍यता अधिक आहे. दुसरीकडे तो आत नेणारच यावर ठाम असल्याचे साने यांनी आज "सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे या विषयावरून सभागृहाबाहेर धुमशान होणार, असे संकेत मिळाले आहेत. 

मागील सभेत विरोधी नगरसेवकांचा माईक बंद करून विरोधकांचा आवाज पालिकेतील सत्ताधारी भाजपने दाबल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. आमच्या ज्येष्ठ सदस्या व माजी महापौर मंगला कदम यांचा माईक बंद करण्याचा आदेश महापौरांनी दिल्याची नोंद झाली असल्याचे साने यांचे म्हणणे आहे. म्हणून विरोधकांचा गळा घोटून भाजपच्या रेटून कारभाराला विरोध करण्यासाठी स्पीकर आत नेऊन विरोधकांचा आवाज बुलंद करणार असल्याचे साने म्हणाले. त्यामुळे आता उद्या सभागृहात नव्हे,तर सभागृहाबाहेर काय होते,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ही धुमश्‍चक्री टाळण्यासाठी पालिकेची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com