पिंपरी महापालिकेचा जनसंपर्क आता सोशल मिडियाद्वारे

आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एखाद्या विकास प्रकल्पाची माहिती वा त्याबाबतचा माहितीपट वा लघुपट फेसबुक वा व्हॉटसअपवर आला, तर आता दचकू नका. कारण महापालिकेनेच आता त्यासाठी सोशल मिडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मे. कंसेप्ट कम्युनिकेशन्स लि. या माध्यम समन्वयक संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापोटी या संस्थेला 25 लाख रुपये मोजले जाणार आहेत.
पिंपरी महापालिकेचा जनसंपर्क आता सोशल मिडियाद्वारे

पिंपरीः आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एखाद्या विकास प्रकल्पाची माहिती वा त्याबाबतचा माहितीपट वा लघुपट फेसबुक वा व्हॉटसअपवर आला, तर आता दचकू नका. कारण महापालिकेनेच आता त्यासाठी सोशल मिडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मे. कंसेप्ट कम्युनिकेशन्स लि. या माध्यम समन्वयक संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापोटी या संस्थेला 25 लाख रुपये मोजले जाणार आहेत. 

सोशल मीडिया तथा जाहिरातबाजी करीतच भाजप गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेवर आली आहे. त्याच्याच आधारे पिंपरीतील 15 वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता घालविण्यात त्यांना यश आले. ते प्रथमच या पालिकेतही सत्तेत आले. आता ती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सध्याच्या सोशल मीडिया या सर्वाधिक वापर आणि लोकप्रिय असलेल्या माध्यमाचा उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. 

उद्योगनगरी असलेले व आता आयटीनगरीही होऊ घातलेले पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने होत आहे. शहराची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांपर्यंत पालिकेच्या विविध योजना, उपक्रम, विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्याचे पालिकेलाही पटले आहे. त्यामुळे सोशल मिडियासह, रेडिओ जिंगल्स, शॉर्टफिल्म, डॉक्‍युमेंटरी इत्यादी माध्यमातून नागरिकांपर्यंत सदर माहिती पोचवण्याकामी पालिकेला माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करणे आवश्‍यक वाटले. म्हणून त्यासाठी त्यांनी टेंडर काढले. त्यात पात्र ठरलेल्या दोन टेंडरधारकांपैकी "कन्सेप्ट'चे टेंडर अंदाजपत्रकी दरापेक्षा 0.2 टक्‍याने कमी असल्याने त्यांची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मान्यतेसाठी हा विषय स्थायी समितीच्या येत्या बैठकीच्या (ता.4) अजेंड्यावर आहे. माध्यम समन्वयक संस्थेच्या नेमणुकीच्या निर्णयामुळे पालिका आपल्या जनसंपर्क अधिकारी व जनसंपर्क विभाग बंद करणार की काय याकडे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com