पिंपरीत पाणीपट्टी दरवाढ भाजपला मागे घ्यावी लागणार? 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्या होणाऱ्या या महिन्याच्या सभेत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. पाणीपट्टीत पाच टक्के, तर पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ प्रशासनाने मागितली आहे. मात्र, त्याला सत्ताधारी भाजपच्या दहा टक्के नगरसेवकांसह सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या विषयावरून उद्याच्या पालिका सभेत गोंधळ होईल, असा अंदाज आहे.
पिंपरीत पाणीपट्टी दरवाढ भाजपला मागे घ्यावी लागणार? 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्या होणाऱ्या या महिन्याच्या सभेत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. पाणीपट्टीत पाच टक्के, तर पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ प्रशासनाने मागितली आहे. मात्र, त्याला सत्ताधारी भाजपच्या दहा टक्के नगरसेवकांसह सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या विषयावरून उद्याच्या पालिका सभेत गोंधळ होईल, असा अंदाज आहे. 

2009-10 नंतर गेली आठ वर्षे पाणीपट्टीत पालिकेने वाढ केलेली आहे. दुसरीकडे पाणीपुरवठ्याचा खर्च वाढला आहे. त्यातुलनेत पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न खूप कमी असल्याने ही वाढ प्रशासनाने सुचविली आहे. हा विषय स्थायीनंतर आता पालिका सभेच्या अजेंड्यावर उद्या आहे. 

शहरात उन्हाळ्यापूर्वीच अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे. अनेक पॉश सोसायट्या त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ही दरवाढ नगरसेवकांना अमान्य आहे. प्रथम पुरेसे पाणी सगळीकडे द्या आणि मग दरवाढ करा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातूनच सत्ताधारी भाजपच्या सात नगरसेवकांनी या पाणीपट्टी वाढीला विरोध केला आहे. तर विरोधी पक्षांनी अगोदरच त्याला कडाडून विरोध करीत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा विषय मंजूर होण्याची शक्‍यता उद्या कमी आहे. तो रेटून नेण्याचा प्रयत्न झाला, तर मात्र गोंधळ होऊ शकतो. 

पाणीपट्टीतील वाढीखेरीज पाणीपुरवठा लाभकरातही वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. हा कर दुप्पट करण्यात आला आहे. त्यालाही विरोधी पक्ष आणि भाजपच्या एका गटाच्या नगरसेवकांचा विरोध आहे. त्यात जुने व एकनिष्ठ भाजपाई नगरसेवक आहेत.हे बहुतांश प्रथमच निवडून आलेले आहेत.ते सर्व तरुण आहेत. त्यामुळे पाणीपट्टी आणि पाणीपुरवठा लाभ कर वाढीवरून उद्या पालिकेत राडा होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com