pimpari-corporaors-nameplates | Sarkarnama

आता पिंपरी पालिकाच लावणार आजी-माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या 

उत्तम कुटे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाच्या जोडीने अनधिकृत फ्लेक्‍सचाही प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलेही आहे. न्यायालयीन आदेश असूनही वरवरची कारवाई होत असल्याने शेकडो नव्हे, तर हजारो फलक शहरात आजही आहेत. त्यामुळे स्वच्छकडून स्मार्टकडे वाटचाल सुरू केलेल्या शहराच्या सौंदर्याला बाधा पोचते आहे. त्यात आता पालिका प्रशासनच आणखी 266 फलक पाच वर्षासाठी उभारून भर टाकणार आहे. पालिकेचे विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या जोडीने माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्याही नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानाजवळ लावण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाच्या जोडीने अनधिकृत फ्लेक्‍सचाही प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलेही आहे. न्यायालयीन आदेश असूनही वरवरची कारवाई होत असल्याने शेकडो नव्हे, तर हजारो फलक शहरात आजही आहेत. त्यामुळे स्वच्छकडून स्मार्टकडे वाटचाल सुरू केलेल्या शहराच्या सौंदर्याला बाधा पोचते आहे. त्यात आता पालिका प्रशासनच आणखी 266 फलक पाच वर्षासाठी उभारून भर टाकणार आहे. पालिकेचे विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या जोडीने माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्याही नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानाजवळ लावण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. 

सध्या पालिकेत 128 नगरसेवक निवडून आलेले आहेत. पाच स्वीकृत मिळून ही संख्या 133 आहे. गत टर्मची मिळून हा आकडा 266 आहे. एवढ्या पाट्या शहरात लागणार असल्याने पाट्याच पाट्या चोहीकडे अशी स्थिती होणार आहे. दरम्यान विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानाजवळ लावण्याचे धोरण नसतानाही अशा पाट्या यापूर्वीच शहरात लागलेल्या आहेत. तसेच त्या एकापेक्षा अधिक आहेत. निवासस्थानाखेरीज नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्या आहेत. खरं, तर फक्त विद्यमान नगरसेवकांचे फलक लागणे समजू शकतो. पण त्याला विरोध होईन म्हणून माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या लावण्यात येणार आहेत. 

पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर पुणे पालिकेचेही पाट्यासंदर्भात धोरण नाही. मात्र, पिंपरीत त्या लावाव्यात अशी सूचना स्थायी समितीकडून आल्याने प्रशासनाने त्या लावण्याचे ठरविले आहे. तीन बाय दोन फूट आकाराची ही पाटी जमिनीपासून सात फूट उंचीवर लावण्यात येणार आहे. ती हिरव्या फ्लोरोसंट रंगामध्ये असून त्यावर नाव, मात्र पांढऱ्या अक्षरात असणार आहे. वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही, अशा ठिकाणी त्या लावल्या जाणार आहेत. या पाट्यांव्यतिरिक्तचे फलक बेकायदेशीर समजून काढून टाकण्यात येणार आहेत. म्हणजे असे अनेक फलक लागले असल्याचे पालिका प्रशासनच मान्य करीत आहेत. 

तहकूब झालेली या महिन्याची पालिका सभा उद्या होत आहे. तिच्या अजेंड्यावर आजी, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घराजवळील मुख्य रस्त्यावर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्याच्या धोरणास मंजुरी देण्याचा हा विषय आहे. तो सहजासहजी विनाचर्चा मान्य होण्याची दाट शक्‍यता आहे. फक्त पाट्या कुठल्या रंगात असाव्यात या उपसूचनेसह तो मंजूर होईल, असे दिसते.  
 

संबंधित लेख