pimpari-BJP-standing-election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

पिंपरीतील भाजपचे बंड होणार थंड 

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शहर भाजपमधील बंड थंड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्या बुधवारी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग निर्धोक झाला आहे. दिलेला आदेश मान्य करा आणि शांत रहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मुंबईतल्या भेटीत सांगितल्याचे कळते. तरीही शहराचे कारभारी असलेले भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजासाठी मुंबईला गेले नाहीत. ते येथेच स्थायी अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत (ता.7) तळ ठोकून राहणार असल्याचे समजते. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शहर भाजपमधील बंड थंड होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्या बुधवारी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग निर्धोक झाला आहे. दिलेला आदेश मान्य करा आणि शांत रहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मुंबईतल्या भेटीत सांगितल्याचे कळते. तरीही शहराचे कारभारी असलेले भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजासाठी मुंबईला गेले नाहीत. ते येथेच स्थायी अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत (ता.7) तळ ठोकून राहणार असल्याचे समजते. 

2019 च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमंत पालिकेच्या खजिन्याची चावी आपल्याच हातात ठेवण्यावरून भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी पालिकेत गेल्या दोन दिवसांत मोठा राजकीय संघर्ष उडालेला आहे. लांडगे समर्थकाचा टर्न स्थायी अध्यक्षपदासाठी असूनही पुन्हा या पदासाठी शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच पाठीराख्याला उमेदवारी दिल्याने लांडगे गटाने बंडाचा झेंडा फडकावला आहे. 

लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे आणि स्थायीचे उमेदवार राहुल जाधव यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे दिले. त्यानंतर क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती तसेच प्रभाग समितींच्या सभापतींनीही राजीनामे दिल्याचे कळते. त्यामुळे स्थायीच्या निवडणुकीत क्रॉस व्होटींग होण्याची भीती होती. 

खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यात लक्ष घातले. सायंकाळी त्यांनी लांडगे यांची समजूत काढली. काही उद्योग करू नका, शांत रहा आणि दिलेला निर्णय मान्य करा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तसाच आदेश लांडगे हे नंतर आपल्या समर्थक पदाधिकारी व नगरसेवकांना देण्याची शक्‍यता आहे. परिणामी लांडगे समर्थकांचे राजीनामाअस्त्र हे पेल्यातील वादळच ठरणार आहे. त्यातून या निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या वाटेतील काटे दूर झाल्यात जमा आहे. 

शहराचे कारभारी असलेल्या दोन्ही आमदारांनी (जगताप व लांडगे) काल एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर लांडगे हे मुंबईला अधिवेशनाला रवाना झाले. मात्र, दिवसभर कामकाजच झाले नाही. त्यामुळे लांडगे व मुख्यमंत्र्यांची सायंकाळी मंत्रालयातच भेट झाली. जगताप हे इकडे पिंपरी-चिंचवडमध्येच तळ ठोकून आहेत.  

संबंधित लेख