पिंपरी भाजपने 6 एप्रिलसाठी नगरसेवक व प्रभागनिहाय ठरविले लक्ष्य

भाजपच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत 6 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून 16 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. त्यामुळे त्यादिवशी शहर भाजप पदाधिकारीमुक्त राहणार आहे.
पिंपरी भाजपने 6 एप्रिलसाठी नगरसेवक व प्रभागनिहाय ठरविले लक्ष्य

पिंपरी : भाजपच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत 6 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून 16 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. त्यामुळे त्यादिवशी शहर भाजप पदाधिकारीमुक्त राहणार आहे.

मेळाव्याचे नियोजन आतापासूनच सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातून पाचशे जणांना नेण्याचे लक्ष्य शहर भाजपने निश्चीत केले आहे. योगायोगाची बाब म्हणजे 1980 ला मुंबईतील ज्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) पक्षाची स्थापना अधिवेशन झाले होते, तेथेच पुढील महिन्यातील स्थापना दिवस मेळावा होणार आहे. 

भाजपच्या 38 व्या वर्धापनदिनाला पक्षाचे दहावे अध्यक्ष अमित शहा संबोधित करणार आहेत. 

6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. त्यानंतर औपचारिक बाबी पूर्ण होऊन 28 एप्रिल 1980 रोजी बीकेसीत पहिले अधिवेशन झाले. ते चार दिवस चालले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे अध्यक्ष होते. वाजपेयींचे परममित्र व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री एम. सी. छागला यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले होते. याच मैदानावर स्थापना दिनाचा मेळावा होत आहे. तो जंगी भरवून व यशस्वी करून बिहार आणि उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीतील पराभवाचे मळभ दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

मेळाव्याच्या तयारीची एक अनौपचारिक बैठक पिंपरीत झाली आहे. उद्या स्थायीचे सदस्य निवड तसेच पालिकेच्या बजेटची सभा झाल्यानंतर तयारीच्या बैठकांचे सत्र सुरु होईल, असे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सांगितले.  

मेळावा तयारीबाबत आमदार जगताप म्हणाले, की प्रत्येक प्रभागातून (एकूण 32) पाचशे असे 16 हजार भाजपाई मेळाव्याला नेण्याचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आलेली आहे. गत पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांवरही हे काम सोपविण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकाला किमान दोन बसची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com