पिंपरी-चिंचवड `स्थायी'चे घुमजाव; बांधकाम परवाना बंदीचा निर्णय फिरविला

प्रखर विरोधामुळे बांधकाम परवाना बंदीच्या निर्णयावरून पिंपरी पालिकेला आज घुमजाव करावे लागले. विरोधकांच्या एकजुटीमुळे या गेल्या आठवड्यातच घेतलेला हा निर्णय फिरवावा लागला. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शहराचे कारभाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. त्यांना काहीशा नामुष्कीलाही सामोरे जावे लागले आहे.
पिंपरी-चिंचवड `स्थायी'चे घुमजाव; बांधकाम परवाना बंदीचा निर्णय फिरविला

पिंपरीः प्रखर विरोधामुळे बांधकाम परवाना बंदीच्या निर्णयावरून पिंपरी पालिकेला आज घुमजाव करावे लागले. विरोधकांच्या एकजुटीमुळे या गेल्या आठवड्यातच घेतलेला हा निर्णय फिरवावा लागला. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शहराचे कारभाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. त्यांना काहीशा नामुष्कीलाही सामोरे जावे लागले आहे.

पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचे अध्यक्ष आणि पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मतदारसंघात बांधकाम परवान्यांना बंदी घालण्याचा निर्णय गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. आमदार जगताप यांच्या सूचनेनुसार तो घेण्यात आल्याचे स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी स्पष्ट केले होते. नंतर स्वत: जगताप यांनीही तो कसा योग्य आहे, ते सांगितले होते. मात्र, निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याकरिता आणि बिल्डरांना ब्लॅकमेल करण्याकरिता तो घेण्यात आल्याची प्रखर टीका सर्वच विरोधकांनी या निर्णयावर केली होती. शहराच्या एका विशिष्ट भागात ही बंदी लागू करण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची विचारणाही त्यांनी केली होती. 

निर्णय वादात सापडल्याने त्यातून माघार घेणे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने नामुष्कीचे ठरणार होते. त्यामुळे सरसकट बंदी न उठविता ती अंशत मागे घेण्याचा ठराव आजच्या स्थायीत झाला. आता तीस हजार चौरस फूटांवरील बांधकामांना बांधकाम परवाना चिंचवडमध्ये दिला जाणार नाही, अशी दुरुस्ती अगोदरच्या निर्णयात स्थायीने केली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजना, म्हाडा, वैयक्तिक बांधकामांना मिळणार या बंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती मडिगेरी यांनी आज दिली. मागील आठवड्यात हा ठराव करताना घोळ झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे तो दुरुस्ती करीत असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com