आमदार बच्चू कडूंकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कौतुक

पंतप्रधान आवास योजनेत अपंगासाठी डीपीआर करा आणि त्यांचा आरोग्य विमा उतरवा अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली. त्याचवेळी पालिकेने अपंगासाठी पेन्शन योजना राबवून अपंग भवन उभारल्याबद्दल कडू यांनी पालिका प्रशासनाचे तोंडभरून कौतूक केले.
आमदार बच्चू कडूंकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कौतुक

पिंपरीः पंतप्रधान आवास योजनेत अपंगासाठी डीपीआर करा आणि त्यांचा आरोग्य विमा उतरवा अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली. त्याचवेळी पालिकेने अपंगासाठी पेन्शन योजना राबवून अपंग भवन उभारल्याबद्दल कडू यांनी पालिका प्रशासनाचे तोंडभरून कौतूक केले.

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था अपंगासाठी काय करीत आहेत आणि त्यांच्यासाठीचा निधी ते खर्च करीत आहेत की नाहीत याबाबत कडू हे राज्यभरात फिरून माहिती घेत आहेत. त्याअंतर्गत ते आज पिंपरी पालिकेत आले होते. यावेळी त्यांनी अपंगांसाठी पेन्शन योजना सुरु केल्याबद्दल पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे खास आभार मानले. नंतर त्यांनी प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याशी चर्चा केली.

अपंग खेळाडूंना बक्षीस देण्याची तसेच सहा वर्षाखालील अपंग बालकांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.तत्पूर्वी त्यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची भेट घेतली. अपंगांसाठीच्या योजना पालिका प्रशासन सक्षमपणे कशा राबवील, याचा पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी साने यांच्याकडे केली. ती त्यांनी मान्य केली. एवढेच नाही, तर लगेच त्यांनी पालिका आयुक्तांना तसे पत्रही दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com