pimapri-police-officer-transfer-rk-padamanabhan-k-venktesham | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभनच, तर पुणे पोलिस आयुक्तपदी डॉ. के. वेकंटेशम

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मान ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर. के. पद्मनाभन यांनाच मिळाला आहे. 

पिंपरीः नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मान ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर. के. पद्मनाभन यांनाच मिळाला आहे. 

पद्मनाभन यांची या पदावर नियुक्ती होणार असल्याचे वृत्त कालच `सरकारनामा'ने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले. तसेच इतर ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांतील खांदेपालटही या वृत्तानुसारच झाला आहे. त्यानुसार पुणे पोलिस आयुक्तपदी नागपुरचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची नियुक्ती झाली आहे. या बदल्याचा जीआर आज निघणार, असेही `सरकारनामा'ने म्हटले होते. त्यानुसार तो आजच गृह विभागाचे उपसचिव  कैलास गायकवाड यांनी काढला.

पद्मनाभन हे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी,वाहतूक) होते. त्यांच्या जागा आता पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या घेणार आहेत.

बदली झालेले इतर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पुढीलप्रमाणेः (नाव आणि कोठून कोठे) 

  • हेमंत नगराळे : नवी मुंबई पोलिस आय़ुक्त ते एडीजी,राज्य पोलिस मुख्यालय,मुंबई
  • संजयकुमार : सीआयडी ते पोलिस आयुक्त,नवी मुंबई 
  • परमवीरसिंह: ठाणे पोलिस आयुक्त ते एडीजी (कायदा व सुव्यवस्था) 
  • विवेक फणसळकर: प्रभारी एडीजी,एसीबी ते ठाणे पोलिस आयुक्त
  • डॉ.भुषणकुमार उपाध्याय: एडीजी (कारागृह) ते नागपूर पोलिस आयुक्त 
  • रजनीशशेठ: प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग ते एडीजी एसीबी
  • संजीव सिंघल: सीआयडी ते सीआयडी
  • अमिताभ गुप्ता: नियंत्रक,वैध मापनशास्त्र ते प्रधान सचिव,गृह विभाग

संबंधित लेख