pimapri-maratha-muslim-dhangar-reservation | Sarkarnama

मराठा, मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण देण्याचा पिंपरीत ठराव

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

मराठ्यांबरोबर मुस्लिम आणि धनगरांनाही आरक्षण देण्याचा ठराव आज पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपेतर राजकीय पक्षांच्या सभेत करण्यात आला. 

पिंपरीः मराठ्यांबरोबर मुस्लिम आणि धनगरांनाही आरक्षण देण्याचा ठराव आज पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपेतर राजकीय पक्षांच्या सभेत करण्यात आला. 

यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात आत्मबलिदान केलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, पोलिस हवालदार शाम काटगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राष्ट्रवादीने पुढाकार घेतलेल्या या सभेकडे भाजपने पाठ फिरविली. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला.

राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना,आरपीआयसह शहरातील इतर धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहूल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमीत गावडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचीन साठे, मनसे शहराध्यक्ष सचीन चिखले,ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी नगरसेविका शमिम पठाण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे आदींचा समावेश होता.  त्यांची भाषणे झाली.

मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे फलक यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख