pik nuksan bharpai aphar | Sarkarnama

तहसिलदार कांबळे आणि बॅंक अधिकारी तुरुंगात बसणार! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पीक नुकसान भरपाई अनुदानातून खटाव तालुक्‍याला मिळालेल्या 64 कोटी रूपयांतील 2.93 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी खटावचे तत्कालिन तहसिलदार अमोल जगन्नाथ कांबळे, प्रवीण सारंग शिदाडे यांच्यासह एक पतसंस्था व चार बॅंकांच्या तत्कालिन शाखा अधिकाऱ्यांवर वडुज पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. 

सातारा: पीक नुकसान भरपाई अनुदानातून खटाव तालुक्‍याला मिळालेल्या 64 कोटी रूपयांतील 2.93 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी खटावचे तत्कालिन तहसिलदार अमोल जगन्नाथ कांबळे, प्रवीण सारंग शिदाडे यांच्यासह एक पतसंस्था व चार बॅंकांच्या तत्कालिन शाखा अधिकाऱ्यांवर वडुज पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. 

खरिप हंगाम 2014-15 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून खटाव तालुक्‍याला 64 कोटी रूपयांचे शासकिय अनुदान उपलब्ध झाले होते. या अनुदानाचे 2016-17 मध्ये वाटप करताना बोगस खातेदार दाखवून त्यातून दोन कोटी 93 लाख, दहा हजार 878 रूपयांचा अपहार झाला होता. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील तपासणीत निष्पन्न झाला. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सध्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडून या सर्व प्रकरणाची तपासणी करून घेतली. यामध्ये तत्कालिन तहसिलदार अमोल कांबळे यांनी बॅंकांच्या तत्कालिन शाखा अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैशांचा अपहार केल्याचे उघड झाले. हे प्रकरण कारवाईसाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. यावर श्री. दळवी यांनी तपासणी करून अपहार रकमेला अमोल कांबळे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार रात्री उशीरा वडुज पोलिस ठाण्यात याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालिन तहसिलदार अमोल कांबळे, प्रवीश शिदाडे, तसेच चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था वडूजचे अधिकारी व कर्मचारी, कऱ्हाड मर्चंट क्रेडीट को ऑपरेटीव्ह सोसायटी कऱ्हाड शाखा वडुज, आयसी आयसीआय बॅंक शाखा वडुजचे तत्कालिन शाखा प्रमुख राकेश मुनास्वामी नायडु, कऱ्हाड अर्बन कोऑप बॅंक कऱ्हाड शाख वडुज, विटा मर्चंट कोऑप बॅंक विटा शाखा वडुज या वित्त संस्थांचा यामध्ये समावेश आहे. 
 

संबंधित लेख