pi who booked mla tilekar get transfer | Sarkarnama

आमदार टिेळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलेल्या इन्स्पेक्टरची बदली

उमेश घोंगडे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांची आज बदली करण्यात आली आहे.

गायकवाड यांच्यासोबत अन्य पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र गायकवाड यांची झालेली बदली सर्वसामान्य बदल्यांचा भाग आहे की टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली करण्याची आली आहे. यावर आता चर्चा सुरू झाली आहे. 

कोंढवा परिसरात केबल टाकणाऱ्या एका व्यावसायिकाला 50 लाख रूपयांची लाच मागिल्याप्रकरणी आमदार टिळेकर, त्यांचे बंधू चेतन टिळेकर व अन्य एकाविरोधात गेल्या आठवड्यात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे पालीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी हा गुन्हा दाखल केला होता.

गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच गायकवाड यांची बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आमदार टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केलेल्या घटनेचा बदलीशी संबंध जोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार टिळेकर यांना अटक कधी होणार याचीही चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर गायकवाड यांच्या बदलीने चर्चेला उधाण आले आहे. गायकवाड यांची विशेष शाखेत बदली झाली आहे. त्यासोबत हेमत भट यांची डेक्कनवरून गुन्हे शाखा, अनिल पाटील यांची वाहतूकमधून कोंढवा पोलिस ठाणे, भास्कर जाधव यांची अलंकार पोलिस स्टेशन गुन्हे शाखावरून डेक्कन वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. 

संबंधित लेख