pi sampat shinde appointed in tofkhana police station | Sarkarnama

श्रीरामपूरचे PI संपत शिंदे यांच्याकडे आता तोफखान्याची जबाबदारी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नगर : जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आज मुख्यालयातून काढण्यात आले. 

नगर : जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आज मुख्यालयातून काढण्यात आले. 

नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची बदली कोतवाली पोलिस ठाण्यात झाली आहे. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांची बदली नगरमध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नगर मुख्यालयातील राजेंद्र भोसले यांची कर्जत पोलिस ठाण्यात, नव्याने हजर झालेले श्रीहरी बहिरट यांची नियुक्ती श्रीरामपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नव्याने हजर झालेले अरविंद माने यांची नियुक्ती शिर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. राहाता पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण कदम यांची सायबरला बदली झाली आहे. सुपे पोलिस ठाण्याचे राजेंद्र पाटील नगरमध्ये जिविशामध्ये बदली करण्यात आली आहे. 

पोलिस निरीक्षक व बदली झालेले पोलिस ठाणे खालीलप्रमाणे ः राजेंद्र चव्हाण (सुपे पोलिस ठाणे), रामराव ढिकले (शेवगाव पोलिस ठाणे), रमेश रत्नपारखी (पाथर्डी), अरुण परदेशी (राहाता), अभय परमार (संगमनेर शहर), अंबादास भुसारे (घारगाव), गोकुळ औताडे (शिर्डी), राकेश मानगावकर (कोपरगाव), ललित पांडुळे (शनिशिंगणापूर), दौलत जाधव (श्रीरामपूर), किरण शिंदे (नगर तालुका), कैलास देशमाने (सोनई), प्रविण पाटील (लोणी), वसंत भोये (एएसटीयु, नगर), वसंत पथवे (मानव संसाधन, नगर), गोविंद ओमासे (टीएमसी, नगर), विकास वाघ (द्विप, नगर), अनिल कटके (आर्थिक गुन्हे शाखा, नगर). 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख