पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडेंचा गावगुंडांनी घेतला धसका!

पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडेंचा गावगुंडांनी घेतला धसका!

वालचंदनगर : वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या कार्यपद्धतीचा इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील गावपुढारी, गावगुंड व अवैध धंदेवाल्यांनी धसका घेतला असून सर्वसामान्य जनतेमधून कानगुडे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कानगुडे यांचा समावेश आहे. कानगुडे यांच्याकडे वालचंदनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. `बोलणे कमी व काम जास्त` त्यांनी कार्यपद्धती अवलंबली आहे.

पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिस्त लावून वर्दीमध्ये राहण्याची सूचना दिली. दोन गटांमध्ये अथवा दोन व्यक्तिंमध्ये भांडण झाल्यास ते मिटविण्यासाठी पोलिस ठाण्याच्या परीसरामध्ये मध्यस्थी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यावर कानगुडे यांनी कारवाईचा बडगा उभारला असून काम असले तर पोलिस ठाण्याला या. आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करुन नका. कायदासुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करु नका, अशी तंबी दिल्यामुळे पोलिस ठाण्यालगत घिरट्या घालणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे.

वालचंदनगर परिसरामध्ये सायंकाळच्या वेळी हत्यार घेवून फिरणाऱ्या युवकांची संख्या वाढत चालली होती. त्याच्यावर ही पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उभारला.तसेच रस्त्यावर,चौकामध्ये तलवारीने केक कापण्याचे प्रमाण वाढण्यास सुरवात झाली होती. त्यांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. अवैध, बेकायदेशीर दारु विक्री, जुगाराचा अड्डे चालविणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरु केला असून छापे मारण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच एका मोठ्या हॉटेलवरती छापा मारुन बेकायदेशीर दारु विक्रीला लगाम लावला आहे. अवैध धंदेवाल्यांनी कानगुडे यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे. तसेच गावोगावी व्यापारी, नागरिकांच्या बैठका घेवून चोरीच्या घटना रोखण्यासाठी, गावामध्ये शांतता राहण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कानगुडे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य जनता खूष असून त्यांचे कौतुक होत आहे. 

वॉरंट असणाऱ्यांची धरपकड...

चेक बाउन्स व इतर प्रकरणामध्ये न्यायालायाचे वाॅरंट असलेले आरोपी न्यायालयामध्ये हजर न राहता भरचौकामध्ये फिरत होते. त्यांच्या विरोधात ही कारवाईचा बडगा उभारला असून वॉरंट असलेल्या नागरिकांना तातडीने अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचा सपाटा लावला आहे.

नवीन पोलिस ठाण्यात एखादा अधिकारी आला की तो सिंघम स्टाइलने सुरवातीला काम करून आपले उपद्रवमूल्य दाखवून देतो. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे सुरू होतात. आपले अर्थपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी आक्रमकता दाखवतात. आता वालचंदनगरमध्ये असे परत घडणार नाही, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com