मुख्यमंत्र्यांच्या गाड्या गेलेला रस्ता गोमूत्र आणि दुधाने धुतला

 मुख्यमंत्र्यांच्या गाड्या गेलेला रस्ता गोमूत्र आणि दुधाने धुतला

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आड लासलगाव येथे आज आले होते. मात्र त्यांच्या बाबतीत वेगळाच प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आज नैताळे गावात बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेले तो रस्ता गोमूत्र व दुधाने शेतकऱ्यांकडून शुर्चिभूत करण्यात आला. 

लासलगाव येथे आज शीतगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. यावेळी नैताळे गावात बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा गेलेल्या नैताळे चौफुलीच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी गोमूत्र व दुग्धार्पण करुन तो रस्ता शुचिर्भूत केला. वाहनाचा ताफा जात असतांना मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले. तेव्हा त्यांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकार अतिशय उदासीन आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा शासनाने केली आहे. केवळ घोषणा करुन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी सबंध गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी 11 च्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांनी गावाच्या वेशीत टाळ वाजवत भजन केले. सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी. अटी घालून सशर्त कर्जमाफी आम्हाला मान्य नसल्याचे फलकही त्यांनी हातात घेतले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेचा विषय झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com