phadnavis and beed district | Sarkarnama

दुष्काळात विरोधकांनी दिशाभूल करण्याऐवजी दिलासा द्यावा : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

बीड : विरोधकांनी दुष्काळाबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये, दुष्काळात सर्वांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. यापूर्वी केंद्र सरकारला दुष्काळाची माहिती जानेवारी महिन्यात जाई. आपण ती ऑक्‍टोबरमध्येच पाठविली आहे. दुष्काळी उपाय योजनांसाठी सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला असून सर्व परिपूर्ण माहितीचा प्रस्ताव विहित वेळेत पाठविल्याचे स्पष्ट करुन दुष्काळावर मात करण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना आणि कायदा व सुवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दुष्काळ आणि त्यावरील उपाय योजनांची माहिती पत्रकारांना दिली. नियमानुसार आवश्‍यक तिथे केंद्र सरकार मदत करेल तर इतर ठिकाणी राज्य सरकारच्या निधीतून कामे केली जातील. अहवाल पाठविण्यात कुठलीही दिरंगाई झाली नाही. यापूर्वी जानेवारीत टंचाई जाहीर केली जाई. आणि मार्च - एप्रिल महिन्यात दुष्काळ जाहीर केला जाई असे ते म्हणाले. 

आता आपण ऑक्‍टोबरमध्येच ही प्रक्रीया पूर्ण केली आहे. जनावरांसाठी चारा दावणीला द्यायचा कि छावणीला द्यायचा असा मुद्दा असला तरी परिस्थितीनुसार जिथे पाण्याची उपलब्धता तिथे दावणीला आणि पाणी नसलेल्या ठिकाणी छावणीला चारा दिला जाईल असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठवाड्याच्या हक्काचे सात टिएमसी पाणी मिळावे यासाठी राज्यपालांच्या सुत्राच्या बाहेर 800 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ऊसाची एफआरपी अधिक वाटप झाली आहे. इतर राज्यांचे प्रमाण 70 टक्‍क्‍यांपर्यंत असून महाराष्ट्रात 90 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

संबंधित लेख