Phadanavis Government have to pay the price says Amit Deshmukh | Sarkarnama

'फसणवीस' सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल : अमित देशमुख यांची टीका

सुशांत सांगवे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर : ‘‘आरक्षण देऊ, असे सांगून हे सरकार सत्तेत आले. इतकी वर्षे होऊनही यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून तर मराठा बांधवांचा रोष या आंदोलनातून व्यक्त होत आहे. तो समजून घेतला नाही तर या सरकारला येणाऱ्या निवडणूकीत मोठी किंमत मोजावी लागेल’’, असे मत आमदार अमित देशमुख यांनी गुरूवारी व्यक्त केले. खरंतर हे ‘फडणवीस सरकार’ नाही, ‘फसणवीस सरकार’ आहे’', अशा शब्दांत त्यांनी सरकारवर तोफही डागली.

#MaharashtraBandh #MarathaReservation

मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. औशाकडून लातूरकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावरच हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अमित देशमुख म्हणाले, ‘‘आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार वेळ काढूपणा करत आहे. आश्वासक चित्रही ते उभ करत नाहीत. शिक्षण, नोकरी, सुरक्षा या आवश्यक गरजा पुरविण्यात सरकार कमी पडत आहे. त्यामुळेच मराठा समाजातील तरुणांच्या मनात असंतोष आहे. त्यांच्या मनातील खदखद आंदोलनातून व्यक्त होत आहे. यासाठी शेकडो, हजारो नव्हे तर कोटीच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी म्हणणे समजून घ्यायला हवे.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख