Petrol-Disel Rates Reduced in State | Sarkarnama

राज्यात पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती. पेट्रोल शंभरीच्या घरात जाऊन पोहोचले होतो. त्यामुळे जनतेत अस्वस्थता होती. आगामी निवडणुकांमध्येही या दरवाढीचा परिणाम जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.

पुणे - देशातील वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणि त्या पार्श्वभूमीवर वाढता असंतोष लक्षात घेऊन पेट्रोल व डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केला. त्या पाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात पाच रुपयांची घट होणार आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती. पेट्रोल शंभरीच्या घरात जाऊन पोहोचले होतो. त्यामुळे जनतेत अस्वस्थता होती. आगामी निवडणुकांमध्येही या दरवाढीचा परिणाम जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकार अबकारी करात दीड रुपयांची कपात करणार असून पेट्रोल कंपन्या एका रुपयाने दर कमी करणार आहेत. त्या पाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

संबंधित लेख