Petrol ,Disel prices will come down - Mungantiwar | Sarkarnama

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार - अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे ट्‌विट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई  :  केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारही पेट्रोलचा दर दोन रुपयांनी आणि डिझेलचा दर एका रुपयाने कमी करणार आहे. याबाबत सोमवारी (ता. 9) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्‌विट केले. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्‍यता आहे. 

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोलवर सर्वाधिक 26; तर डिझेलवर 25 टक्‍के व्हॅट आकारला जात आहे. 2015 पासून सरकारने दुष्काळ सेस लावल्याने पेट्रोल आणि डिझेल इतर राज्यांच्या तुलनेत महाग आहे. पेट्रोलवर 26 टक्‍के व्हॅट असून 11 रुपये दुष्काळ सेस लावला जातो. त्यामुळे पेट्रोलचा दर 80 वर पोहचला. यामुळे राज्य सरकार तब्बल 17 हजार 800 कोटींची अधिकची वसुली करत आहे. डिझेलवरही दोन रुपयांचा दुष्काळ कर असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारनेही राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पेट्रोल दोन रुपयांनी आणि डिझेल एका रुपयाने स्वस्त होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 

संबंधित लेख