मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात उसळली गर्दी

कधी नव्हे ते मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांचा बहुतांश वेळ खितपत पडलेल्या फाईंलींवर स्वाक्षरी करणे, कळीचे विषय तातडीने मार्गी लावणे, अधिका-यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे, व्हीआयपींसोबत चर्चा करणे यांतच निघून जातो. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनाबाहेर तासनतास ताटकळत उभ्या राहिलेल्या सामान्य लोकांना न भेटताच काही मंत्री निघून जातात.
मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात उसळली गर्दी

मुंबई - कधी नव्हे ते मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी सामान्य जनतेची मोठी गर्दी उसळली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यानच मंत्री मंत्रालयात असतात,  याची माहिती सामान्य लोकांनाही माहित झाल्यामुळे आपली कामे घेऊन अनेकजण मंत्रालयात आले होते.

बहुतांश मंत्र्यांच्या दालनातील अभ्यागत कक्ष तुडुंब भरला होता. त्यामुळे काही मंत्र्यांच्या दालनाबाहेर अक्षरश: रांगा लागल्या होत्या. विशेषत: चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, राम शिंदे, विष्णू सवरा, राजकुमार बडोले, दीपक केसरकर, जयकुमार रावल, संभाजी पाटील – निलंगेकर या मंत्र्याच्या दालनाबाहेर तोबा गर्दी उसळली होती.

विशेष म्हणजे, बहुतांश मंत्र्यांनी मंत्रालयात फार वेळ घालविण्यापेक्षा आपल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार संघ, तालुका व जिल्ह्यात काहीही करून भाजपाची पाळेमुळे खोल रोवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाकडून सगळ्यांना सक्त सुचना आहेत. अशातच गेली दोन वर्षे सतत निवडणुकीच्या धामधुमीत गेली. त्यामुळे बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्यापेक्षा मतदारसंघाला अधिक महत्व दिले आहे.

कधी नव्हे ते मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांचा बहुतांश वेळ खितपत पडलेल्या फाईंलींवर स्वाक्षरी करणे, कळीचे विषय तातडीने मार्गी लावणे, अधिका-यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे, व्हीआयपींसोबत चर्चा करणे यांतच निघून जातो. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनाबाहेर तासनतास ताटकळत उभ्या राहिलेल्या सामान्य लोकांना न भेटताच काही मंत्री निघून जातात. तर काहीजण तर भेटण्यास आलेल्या लोकांकडून केवळ कागद घेऊन ते त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे देण्याचे सोपस्कार पार पाडतात.

मंत्री आठवड्यातून किमान तीन दिवस जरी मंत्रालयात उपस्थित राहिले तरी सामान्य लोकांना होणारा त्रास कमी होईल, असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com