भाजपचा पिंपरी-चिंचवडला रेटून कारभार

वीस कोटी रुपये खर्चून बांधलेले रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिकेने सोमवारी घेतला. त्यातून सरकारी सेवा खासगीकरणाचे लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत आल्याचे स्पष्ट झाले. खेदाची आणि वादाची बाब म्हणजे पुरेशा चर्चेविना वीस कोटी रुपयांचा हा विषय दहा मिनिटात मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याला सर्व स्तरातून आता विरोध होत असून शिवसेनेने,तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचा पिंपरी-चिंचवडला रेटून कारभार

पिंपरी: वीस कोटी रुपये खर्चून बांधलेले रुग्णालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिकेने सोमवारी घेतला. त्यातून सरकारी सेवा खासगीकरणाचे लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत आल्याचे स्पष्ट झाले. खेदाची आणि वादाची बाब म्हणजे पुरेशा चर्चेविना वीस कोटी रुपयांचा हा विषय दहा मिनिटात मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याला सर्व स्तरातून आता विरोध होत असून शिवसेनेने,तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

भोसरीत बांधलेले हे शंभर खाटांचे हॉस्पिटल पुरेसे मनुष्यबळ नसल्याने खासगी संस्थेला देण्यात आल्याचा साक्षात्कार ते पूर्ण बांधून झाल्यावर पालिकेला झाल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यातून शहरात पालिका बांधत असलेल्या इतर रुग्णालयांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. किमान अत्यावश्यक सेवांचे खासगीकरण नको असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे गरिब त्यापासून वंचित राहण्याची शक्यता व भीती आहे. तसेच पिंपरी चिंचवड पालिका देशातच नाही, तर आशिया खंडात श्रीमंत आहे. त्यामुळे वैद्यकीय या अत्यावश्यक सेवेच्या खासगीकरणाची गरज नव्हती व नाही, असाही सूर आहे.

यापूर्वी पालिकेच्या  वायसीएम या एकमेव सर्वोपचार रुग्णालयाचा काही भाग पुणे येथील एका खासगी रुग्णालयाला ह्रदयरोग उपचारासाठी देण्यात आला आहे. आता, तर अख्खे हॉस्पिटलच दिले आहे. एवढेच नाही, तर त्यापोटी पालिका भाडे घेणार नाही. तर,उलट हे रुग्णालय चालवायला दिलेल्या संस्थेलाच पैसे आणि ते सुद्धा काही कोटी रुपयांत मोजणार आहे. असा उरफाटा प्रकार देशात प्रथमच घडत आहे. करदात्यांच्या पैशाची ही उधळपट्टीच नव्हे, तर लूट असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेचे जितेंद्र ननावरे यांनी दिला आहे. तसेच तेथे मोफत वा किफायतशीर वैद्यकीय उपचार मिळतील याविषयीही त्यांनी शंका उपस्थित केली असून ती रास्त आहे. यावर बोलण्यास पालिका प्रशासनाने मिठाची गुळणी घेतली आहे. स्थापत्य व वैद्यकीय विभाग एकमेकांकडे बोटे दाखवित आहे.

भोसरी रुग्णालयच नाही, तर शहरात ४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या संतपीठाचा विषयही सत्ताधारी भाजपने गोंधळात विरोधकांचे न ऐकता रेटून याच सभेत मंजूर केला. या कामाच्या निविदेत रिंग झाल्याचा आरोप आहे. तसेच ११ टक्के वाढीव दराने ती मंजूर केल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. वादग्रस्त ठरलेली ही दोन्ही कामे भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगेच्या मतदारसंघातील आहेत. यापूर्वीही लांडगे यांच्याच मतदारसंघातील पालिकेची रस्तेबांधणीची सव्वापाचशे कोटी रुपयांची कामेही वादात सापडली होती. त्याबाबत, तर शहरातील शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती. विकासकामांना विरोध नाही. तो फक्त त्यातील घोटाळ्याला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची नाहक उधळपट्टी होते. टक्केवारीमुळे कामेही दर्जेदार होत नाहीत.शिवाय गरजू आणि गरिब सेवेपासून वंचित राहतात, ते वेगळेच.तसेच सध्या शहराला कर्करोग रुग्णालय आणि जळीत वॉर्डाची नितांत आवश्यकता आहे. मात्र, त्याऐवजी तुलनेने कमी आवश्यकता आणि महत्त्व असलेल्या कामांना प्राधान्य दिले जात आहे, याबद्दल नाराजी आणि संताप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com