PCMC Smart City Meeting Quarrel between Commissioner and Leader of Opposition | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

नोकर आहात, नोकरासारखे रहाः पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना सुनावले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

शहरातील खासदार भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी या बैठकीला उपस्थित होते. या दरम्यानच इतर कार्यक्रम असल्याने बारणे व चाबूकस्वार बाहेर पडले. त्यानंतर भाजपनेच ही बैठक 'हायजॅक' केली. अगदी 'शॉर्ट नोटीस' देऊन ही बैठक बोलावली होती. तरी तिला खासदार, आमदारांसह आमंत्रित उपस्थित होते. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची आजची पहिलीच बैठक वादळी झाली. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने उल्लेख अज्ञानी असा करून त्यांचा अवमान केला. त्यावर 'तुम्ही नोकर आहात, नोकरासारखे रहा, मालक होऊ नका,' असे आयुक्तांना सुनावत साने तरातरा बैठकीतून बाहेर पडले. तत्पूर्वी या दोघांत मोठे वादंग झाले. त्यांच्यात 'आरे ला कारे' ची भाषा झाली. आयुक्तांनी आवाज चढवून वक्तव्य केल्याने मी त्यांना तशाच भाषेत सुनावले, असे साने यांनी नंतर सांगितले.

शहरातील खासदार भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी या बैठकीला उपस्थित होते. या दरम्यानच इतर कार्यक्रम असल्याने बारणे व चाबूकस्वार बाहेर पडले. त्यानंतर भाजपनेच ही बैठक 'हायजॅक' केली. अगदी 'शॉर्ट नोटीस' देऊन ही बैठक बोलावली होती. तरी तिला खासदार, आमदारांसह आमंत्रित उपस्थित होते. 

स्मार्ट सिटीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नागपूर येथील संस्थेने प्रेझेंटेशन सुरु केले. त्यावेळी साने यांनी अगोदरच स्मार्ट झालेल्या भागाची निवड केल्याबद्दल आक्षेप घेतला. त्याऐवजी समाविष्ट गावाचा वा स्मार्ट न झालेल्या भागाची निवड करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र हे अगोदरच पाहणी करून व जनमत घेऊन ठरल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यात आयुक्तांनी मध्येच तोंड घातले. याबाबत तुम्ही अज्ञानी आहात, असे आवाज चढवून सांगितले. यावर साने भडकले. तीन टर्म नगरसेवक असल्याने मला सर्व कळते असे ते म्हणाले. तसेच आम्ही शहराचे विश्वस्त असून तुम्ही नोकर आहात, तसेच वागा, असे त्यांनी आयुक्तांना सुनावले. 

मालकासारखा रुबाब दाखवू नका, असे बोलायला ते विसरले नाहीत. आयुक्तांचा आवाजही चढलेला  होता. त्यामुळे संतापलेल्या साने यांचाही पारा चढला. त्यांचा हा आवाज बैठक सुरु असलेल्या कक्षाबाहेर ऐकू आला. दरम्यान, आयुक्तांना सुनावून बैठक अर्धवट सोडून साने बाहेर पडले.

संबंधित लेख