PCMC politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला कार्यालयासाठी पुरेशी जागाही मिळेना 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पाशवी बहुमताने सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सत्तेतून पायउतार होताच पुरेसे कार्यालयही मिळत नसल्याने पक्षासाठी कुणी मोठे कार्यालय देता का अशी विचारणा करण्याची वेळ या आता मावळत्या सत्ताधाऱ्यांवर आली आहे. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पाशवी बहुमताने सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सत्तेतून पायउतार होताच पुरेसे कार्यालयही मिळत नसल्याने पक्षासाठी कुणी मोठे कार्यालय देता का अशी विचारणा करण्याची वेळ या आता मावळत्या सत्ताधाऱ्यांवर आली आहे. 

या पक्षाचा गटनेता निवडून कित्येक दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांनी देऊ केलेल्या माजी विरोधी पक्षनेत्यांच्या (कॉंग्रेस) कार्यालयाचा अद्याप ताबा घेतलेला नाही. दुसरीकडे प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपचे उपमहापौर शैलजा मोरे यांनी मावळत्या उपमहापौर कार्यालयाचा ताबा घेतला असून हाच कित्ता या पक्षाचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनीही गिरविला आहे. दरम्यान, आमचा हक्क मान्य झाला नाही,तर पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या केबिनशेजारील बैठक कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांनी दिला आहे. 

बहल यांची नियुक्ती त्यांच्या पक्षातीलच काही नगरसेवकांना मान्य नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी बहल यांच्या नेतृत्व अमान्य करीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तो गुंता सुटलेला नसतानाच हातची सत्ता गेलेल्या राष्ट्रवादीला आपल्या सदस्यसंख्येला पुरेल एवढे कार्यालय तूर्त, तरी उपलब्ध नाही. निवडून आलेल्या 36 या सदस्य संख्येला पुरेसे होईल, एवढे कार्यालय देण्याची तोंडी मागणी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे केली असल्याचे बहल यांनी सांगितले. आम्ही महापौर निवडीत समजूतदारपणा नुकताच दाखविला असून सत्तेत असताना "मनसे'व भाजपचे पुरेसे सदस्य नसतानाही त्यांनी कार्यालये उपलब्ध करून दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच विरोधी पक्षाला पुरेसे कार्यालय मिळणे हा आमचा हक्कच असून तो मिळावा, अशी आमची मागणी आहे,असे ते म्हणाले. 

दरम्यान, पालिकेतील विविध पक्ष कार्यालय वाटपाचे काम शहर अभियंता कार्यालयामार्फत केली जाते. मात्र, राष्ट्रवादीकडून अशी लेखी मागणी आमच्याकडे अद्याप आली नसल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले.दरम्यान, बहल यांनी आपल्या कार्यालयाचा ताबा अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते कार्यालय आणि तेथील कर्मचारी वाट पाहत असून विरोधी पक्षनेत्यांची खुर्चीही रिकामीच आहे. दुसरीकडे फक्त एकच नगरसेवक निवडून आलेल्या "मनसे'ने आपल्या जुन्या कार्यालयाचा पुन्हा ताबा घेतला आहे. शिवसेनेचेही जुने कार्यालयही कायम राहिले आहे. फक्त एकही नगरसेवक निवडून न आल्याने कॉंग्रेस या मावळत्या विरोधी पक्षाला यावेळी पालिकेत कार्यालय नसण्याची नामुष्की ओढवली आहे. 
 

संबंधित लेख