PCMC Dy Mayor Firtst Entry into Politics | Sarkarnama

महिला आरक्षणामुळेच गृहिणीचे राजकारणात पाऊल : पहिल्याच टर्ममध्ये झाल्या उद्योगनगरीच्या उपमहापौर

उत्तम कुटे
रविवार, 10 जून 2018

सुरुवातीपासून राजकारणाशी संबंध नाही. पण मुलाचे कार्य आणि राहत्या प्रभागात पडलेले महिलांचे आरक्षण यामुळे गृहिणी असलेल्या शैलजा मोरे यांची राजकारणात एंट्री झाली. एवढेच नाही, तर त्या थेट उद्योगनगरीच्या उपमहापौरही झाल्या.

पिंपरी : सुरुवातीपासून राजकारणाशी संबंध नाही. पण मुलाचे कार्य आणि राहत्या प्रभागात पडलेले महिलांचे आरक्षण यामुळे गृहिणी असलेल्या शैलजा मोरे यांची राजकारणात एंट्री झाली. एवढेच नाही, तर त्या थेट उद्योगनगरीच्या उपमहापौरही झाल्या.

सौ. मोरे या मूळच्या मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरच्या सरदार परांडे घराण्याच्या. त्यांचे लग्न शिंदे राजघराण्याच्या सैन्यात अधिकारी असलेल्या मोरे कुटुंबात झाले. त्यांचे पती अविनाश यांचे आजोबा राजघराण्याच्या सैन्यात अधिकारी होते. नंतर मोरे कुटंब हे महाराष्ट्रात अमरावतीत आले. तेथून अविनाश हे नोकरीनिमित्त पिंपरीत 1975 ला आले .सौ. मोरे पहिल्यापासून गृहिणी. राजकारणाशी त्यांचा सबंध नव्हता.

त्यांचे पती जनसंघाचे काम करीत होते. मात्र, 2002 ला त्यांनी ते थांबविले. दुसरीकडे त्यांचा मुलगा अनूप याची राजकारणात एंट्री झाली. त्याचवर्षी तो भाजपच्या विद्यार्थी आघाडीचा शहर सरचिटणीस, तर 2005 ला शहराध्यक्ष झाला. 2007 ला भाजयुमो चा शहराध्यक्ष आणि 2013 ला शहराच्या फादर बॉडीत तो सरचिटणीस झाला. सध्या तो भाजयुमोचा प्रदेश सचिव आणि राज्य माथाडी महामंडळाचा सदस्य आहे.

मोरे राहत असलेल्या आकुर्डी प्राधिकरणातील प्रभाग 2012 ला महिला राखीव झाला. त्यामुळे तेथून सौ. मोरे निवडणुकीला उभ्या राहिल्या. मात्र, त्यांचा पराभव झाला. पालिकेत राष्ट्रवादी सत्तेत आली. मात्र, त्या खचून गेल्या नाहीत. त्यांचे व विशेषकरून त्यांचा मुलगा अनूप याचे काम सुरुच होते. 2017 ला त्यांचा प्रभाग पुन्हा महिलांसाठी राखीव राहिला. त्यामुळे सौ. मोरे पुन्हा उभ्या राहिल्या. त्या निवडून आल्या. भाजप पहिल्यांदा पालिकेत सत्तेत आला. पहिल्यांदाच राजकारणात यशस्वी पहिले पाऊल टाकलेल्या सौ. मोरे पहिल्याच टर्ममध्ये उपमहापौर झाल्या आहेत.

संबंधित लेख