pcmc | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडच्या घसरणीला आयुक्‍त जबाबदार ! 

उत्तम कुटे 
शुक्रवार, 5 मे 2017

स्वच्छ भारत स्पर्धेत शहराचा दर्जा व नंबरही घसरल्याने त्यावरून आता "तू-तू,मै-मै'चे राजकारण शहरात रंगण्याची शक्‍यता आहे. हा दर्जा खालावण्यास राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आरोप सत्तेत भाजपकडून होण्याची शक्‍यता आहे.तर, हा क्रमांक भाजपला टिकविता न आल्याची टीका राष्ट्रवादीकडून होईल, असा अंदाज आहे.

पिंपरी : गेल्यावर्षी "टॉप टेन' मध्ये (नऊ) असलेल्या पिंपरी-चिंचवडचा दर्जा "स्वच्छ सर्वेक्षण 2017' मध्ये मोठ्या प्रमाणात घसरला असून शहर 73 व्या क्रमांकांवर फेकले गेले आहे. नुकतेच बदली झालेले अकार्यक्षम पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि या स्वच्छ भारत स्पर्धेतील प्रभावी "प्रेझेंटेशन'अभावी ही आफत आल्याचे बोलले जात आहे. शहर हागणदारीमुक्त न झाल्याची बाबही त्याला कारणीभूत ठरली आहे. 

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने 2016 पासून हे अभियान सुुरू केले आहे. पहिल्याच वर्षी देशभरातील 73 शहरे त्यात सामील झाली. त्यात नववा क्रमांक पिंपरी-चिंचवडने मिळविला होता. हा सन्मान त्यावेळचे पालिका आयुक्त राजीव जाधव व पालिका पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन स्वीकारला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर वाघमारे आयुक्त म्हणून शहरात आले. त्यांची इच्छा नसतानाही फक्त पालिका निवडणुकीपुरते त्यांना आणल्याची चर्चा झाली होती. ही निवडणूक झाल्यानंतर वर्षभरातच टर्म पूर्ण होण्याच्या आतच त्यांची बदली झाल्याने ही चर्चा खरीही ठरली. कुटुंब मुंबईत असल्याने नाइलाजाने त्यांना येथे काम करावे लागले. परिणामी स्वच्छ सर्वेक्षणाचा दर्जा टिकविता आला नाही. उलट तो प्रचंड घसरला. नवव्या क्रमाकांवरून शहर 73 व्या नंबरवर फेकले गेले. 

 

संबंधित लेख