pawar will speak to cm on hinjwadi traffic issue | Sarkarnama

हिंजवडीच्या ट्रॅफिक जॅम प्रश्नातून पालकमंत्री Delete ! आता पवार आणि मुख्यमंत्र्यांचा call

उमेश घोंगडे
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे : माहिती तंत्रज्ञानाची नगरी असलेल्या पुण्यातील हिंजवडीत रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून यश मिळत नसल्याने या प्रकरणात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालण्याचे ठरवले आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्र्यांऐवजी विरोधी नेत्यांच्या पुढाकारतून होणाऱ्या बैठकीतून ठोस मार्ग काढावा लागणार आहे. 

पुणे : माहिती तंत्रज्ञानाची नगरी असलेल्या पुण्यातील हिंजवडीत रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून यश मिळत नसल्याने या प्रकरणात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालण्याचे ठरवले आहे. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्र्यांऐवजी विरोधी नेत्यांच्या पुढाकारतून होणाऱ्या बैठकीतून ठोस मार्ग काढावा लागणार आहे. 

माहिती तंत्रज्ञानातील अनेक बहुराष्ट्रीय कंपनी हिंजवडी "आयटी पार्क'मध्ये आहेत. शहराच्या विविध भागांतून रोज सुमारे साडेतीन लाख कर्मचारी सुमारे सव्वादोन लाख वाहनातून या भागात येतात. दोन किलोमीटरच्या अंतरासाठी दोन-दोन तास थांबावे लागते, अशी सध्याची इथली वाहतुकीची स्थिती आहे.

हजारो कोटी रूपयांची उलाढाल असलेल्या या परिसरात वाहतून कोंडी होऊ नये, यासाठीचे आवश्‍यक नियोजन आधीपासून करायले हवे होते. मात्र गेल्या काही वर्षात ठोस काही झाले नाही. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधीकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र त्याचे कामदेखील अपेक्षित गतीने होताना दिसत नाही. प्राधीकरणाचे अध्यक्ष किरण गित्तेदेखील कार्यक्रम आणि बैठकांमध्ये कायम व्यस्त असतात. त्यामुळे वाहतुकीसारख्या कमी महत्वाच्या प्रश्‍नांसाठी त्यांना वेळ मिळत नसावा. पालकमंत्र्यांकडूनदेखील फारसे काही होताना दिसत नाही.

या साऱ्या कोंडिला स्थानिक लोक आणि या परिसरातील कंपन्यांमध्ये रोज येणारे कर्मचारी अक्षरश: वैतागले आहेत. काहीच होत नसल्याने पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या प्रश्नी पवार यांची भेट घेतली. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन या नगरसेवकांना दिले आहे. वाहतूक कोंडीचा स्थानिक प्रश्‍न दोन्ही महापालिका आणि पालकमंत्र्यांच्या पातळीवर सुटायला हवा. मात्र स्थानिक पातळीवर काहीच होत नसल्याने पवार यांना हा विषय मुख्यमंत्र्यांना दरबारात नेण्याची वेळ आली आहे. 

मुळात हा प्रश्‍न स्थानिक वाहतुकीपुरता मर्यादीत वाटत असला तरी त्याचे परिणाम पुण्याची प्रतिमा आणि त्या माध्यमातून होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीवर होणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या परिसरात आहेत. या कंपन्यांचे वरिष्ठ आधिकारी कंपनीत येत असतात. त्यांनाही दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असेल तर त्याचा परिणाम भविष्यातील गुंतवणुकीवर होण्याचा धोका आहे.

संबंधित लेख