शरद पवारांनी घेतली ज्येष्ठांच्या दातांची काळजी!

`दात पाडणे`, दात घशात घालणे असे विविध वाक्प्रचारराजकारणात रूढ आहेत. प्रत्येक राजकीन नेता आपल्या विरोधकांसाठी तीच कृती करण्याचा प्रयत्न असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या दातांची काळजी घेत पुणे जिल्ह्यात सर्वत्र दंतोपचार शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शरद पवारांनी घेतली ज्येष्ठांच्या दातांची काळजी!

वालचंदनगर : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील 18 नागरिकांना मुंबईमध्ये मोफत दातांच्या कवळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने इंदापूर तालुक्यामध्ये या आठवड्यामध्ये मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरामध्ये तालुक्यातील 848 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यातील 18 नागरिकांना कवळ्या बसविणे गरजेचे होते. शनिवार (ता.17) रोजी 18 नागरिकांवरती मुंबईमध्ये उपचार करुन आज रविवार (ता.18) रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोफत कवळ्या भेट देण्यात आल्या. यातील एका कवळीची किंमत अडीच लाख रुपये आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने या वेळी उपस्थित होते.

यावेळी माने यांनी सांगितले की शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हातील मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन जास्तीजास्त नागरिकांची मोफत तपासणी करुन उपचार करण्यात येणार आहे. इंदापूर तालुक्यातील शिबिरासाठी इंडियन डेंटल मेडिकल डॉ. संतोष भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com