Pawar _Jaykumar Gore toured together ! | Sarkarnama

पवार - जयकुमार गोरे यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्याची जिल्ह्यात चर्चा !

सरकारनामा : सातारा
सोमवार, 8 मे 2017

बिदाल आणि किरकसाल दौऱ्यात राष्ट्रवादीचे माणचे नेते शेखर गोरेंची अनुपस्थिती सर्वांना जाणवली. उलट त्यांच्या ऐवजी आमदार जयकुमार गोरेच या दौऱ्यात श्री. पवारांसोबत राहिले.

सातारा :  राष्ट्रवादी  काँग्रेसचे  अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कारमध्ये बसून काँग्रेसचे  माण-खटावचे आमदार  जयकुमार गोरे यांनी केलेला पाहणी दौरा माणसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आज चर्चेचा विषय बनला .  

 निमित्त होते बिदाल येथे श्रमदानातून झालेल्या जलसंधारणांच्या कामांची माहिती देण्याचे!  दोघांनी एका गाडीतून प्रवास केला तसेच श्री. पवार यांनी गोरेंकडून येथील कामांची माहिती घेतली. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बिदाल आणि किरकसाल दौऱ्यात राष्ट्रवादीचे माणचे नेते शेखर गोरेंची अनुपस्थिती सर्वांना जाणवली. उलट त्यांच्या ऐवजी आमदार जयकुमार गोरेच या दौऱ्यात श्री. पवारांसोबत राहिले. मात्र, किरकसाल येथील कामांच्या पहाणीसाठी आमदार जयकुमार  गोरे उपस्थित राहिले नाहीत.

माण तालुक्‍यातील बिदाल व किरकसाल येथे श्रमदानातून झालेल्या जलसंधारणांच्या कामांची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज दौऱ्यावर आहेत. महाबळेश्‍वर मुक्कामी असताना  स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून जलसंधारणाची चांगली कामे केली आहेत अशी माहिती मिळाल्यावर   त्यांनी हा माणचा दौरा आखला. 

दौऱ्यात सुरवातीला ते बिदाल मध्ये गेले. येथे श्रमदानातून झालेल्या कामांची त्यांनी पहाणी केली. ही पहाणी करताना त्यांच्यासमावेत कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरेउपस्थित होते.

श्री. पवार व आमदार गोरेंनी एका गाडीतून प्रवास करत या
कामांची पहाणी केली. तसेच त्यांच्याकडून या कामांची माहिती ही घेतली.

. जिल्ह्यातील राष्ट्रवादीकडून टार्गेट होणारे आणि प्रसंगी
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करणारे जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समवेत  कामांच्या पहाणी दौऱ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचेपाहून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी माजीआमदार प्रभाकर घार्गेसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित लेख