pawar and nagar ncp leader | Sarkarnama

भाजपसोबत आघाडी न करण्याचे आदेश दिले होते : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

नगर : महापौर निवडीसाठी भाजपशी आघाडी न करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक नेतृत्त्वांना दिले होते. तरीही भाजपशी आघाडी झाली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पाच तारखेपर्यंत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नगरमध्ये भाजपसोबत जाण्याचे कारण नव्हते. आपण भाजपशी आघाडी करू नये, प्रसंगी तटस्थ रहावे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यांच्या मार्फत देण्यात आले होते. असे असतानाही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान केले.

नगर : महापौर निवडीसाठी भाजपशी आघाडी न करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक नेतृत्त्वांना दिले होते. तरीही भाजपशी आघाडी झाली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पाच तारखेपर्यंत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नगरमध्ये भाजपसोबत जाण्याचे कारण नव्हते. आपण भाजपशी आघाडी करू नये, प्रसंगी तटस्थ रहावे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यांच्या मार्फत देण्यात आले होते. असे असतानाही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान केले. हे कोणाच्या नेतृत्त्वाखाली केले, याचीही चौकशी होऊन त्यांच्यावरही पक्ष कारवाई करेल. नगरसेवकांना यापूर्वी नोटीसा दिल्या आहेत. त्यांच्यावरील कारवाईचे स्वरुप लवकरच जाहीर केले जाईल, असा इशारा पवार यांनी दिला. 

ते आमदार मला भेटले होते 
नगरचे ते आमदार (संग्राम जगताप) मला भेटले होते. त्यांनी स्थानिक परिस्थिती समजावून सांगितली. त्यात काही अंशी तथ्यही होते. मात्र आपल्यावर अन्याय होत असेल, तर त्याचा वेगळा विचार करू, परंतु भाजपशी आघाडी करायची नाही, असे मी स्पष्ट सांगितले होते, असे पवार म्हणाले. 

आमदार जगताप उशिरा आले, कार्यक्रम संपताच गेले 
दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्याने आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई होते, याबाबत उत्सुकता आहे. आज जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त पवार नगरला आले होते. या वेळी आमदार संग्राम जगतापही आले होते. परंतु आमदार जगताप पवार यांच्यासोबत न राहता स्टेजवर उशिरा आले नंतर लगेचच निघून गेले. 

संबंधित लेख