patistan | Sarkarnama

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

जम्मू : पाकिस्तानच्या सैनिकांनी आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबारेषेवरील चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची एप्रिलमधील सहावी घटना आहे. 

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले, की राजौरी जिल्ह्यातील नौशेरे सेक्‍टरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय चौक्‍यांवर सकाळी आठच्या सुमारास गोळीबार केला. या वेळी भारतानेही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दुपारपर्यंत हा गोळीबार सुरू होता. यापूर्वी पाकिस्तानने 8 एप्रिलला राजौरी जिल्ह्यात गोळीबार केला होता. तसेच पूँच जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पाच एप्रिलला शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.  

संबंधित लेख