सेल्फी काढायला खड्डाच राहणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

सेल्फी काढायला खड्डाच राहणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

सातारा : मराठा आरक्षण दिले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे विरोधक आता हतबल झाले असून त्यांनी सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू केले आहेत, असा टोला महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. राष्ट्रवादीचे नेते सातत्याने सेल्फी वुईथ खड्डा काढून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवत असतात. कराड येथे रात्री झालेल्या सर विश्वेश्वरय्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 

ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. सहा कोटींचे मशिन आणले असून त्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील तळवळ येथे रस्त्याचे काम सुरू आहे. ते मशिन संपूर्ण रस्ता खरवडत जात असून खरवडलेल्या रस्त्याच्या डांबर व साहित्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल मिश्र केल्यास त्यातूनच पुन्हा रस्ता तयार होत आहे. मशिन दिवसाला एक किलोमीटर असा रस्ता तयार करते. तो रस्ताही 20 वर्षे टिकेल असा असेल. त्यामुळे विरोधकांनी ठरवले त्या रस्त्याला खड्डा मारून सेल्फी काढायचा तरीही रस्त्यावर खड्डा मारू देत नाही, असा टिकावू रस्ता होईल. तो प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर त्याचा वापर होईल. मराठा आरक्षण झाले, कर्जमाफी दिल्यामुळे विरोधक हतबल आहेत. त्यामुळे सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com