Patangrao Kadam's contributuion in technical education is huge - Sharad Pawar | Sarkarnama

तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही पतंगरावांचे मोठे योगदान -  शरद पवार 

सरकारनामा  
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे .

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे .

ट्विटरवर पाठवलेल्या शोकसंदेशात शरद पवार म्हणतात ,
" काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली.शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत."

" तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही पतंगरावांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांनी विधिमंडळातही आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. शासनामध्ये प्रभावशाली मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा त्यांनी निर्माण केला.पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो."

" दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी केलेल्या श्रद्धांजलीपर ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की , "कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाले.सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

संबंधित लेख