Patangrao Kadam : sharad Pawar would have been prime minister of India | Sarkarnama

.....अन्यथा आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला असता - पंतगराव कदम 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई  : " शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात दोन चुका केल्या एक म्हणजे डिफेन्स मंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परत येवून मुख्यमंत्री व्हायला नको होतं अन् दुसरी म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडायला नको होती, अन्यथा आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला असता ",असे मत  माजी वनमंत्री व काँग्रेसचे आमदार पंतगराव कदम यांनी व्यक्त केले .

मुंबई  : " शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात दोन चुका केल्या एक म्हणजे डिफेन्स मंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परत येवून मुख्यमंत्री व्हायला नको होतं अन् दुसरी म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडायला नको होती, अन्यथा आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला असता ",असे मत  माजी वनमंत्री व काँग्रेसचे आमदार पंतगराव कदम यांनी व्यक्त केले .

विधानसभेत पद्मविभूषण शरद पवार आणि आमदार गणपतराव देशमुख यांच्या पन्नास वर्षाच्या संसदीय कारकिर्द पूर्तते निमित्ताने सरकारच्या वतीने मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमतानी पाठींबा देत हा ठराव मंजूर केला. 

श्री .  शरद पवार यांची आठवणी सांगताना काँग्रेस नेते पंतगराव कदम म्हणाले, " मी अन् पवारसाहेब हेलिकाँप्टरने एका कार्यक्रमाला जात होतो. तेंव्हा साहेब मला म्हणाले पंतगराव कुठं आलोयं माहितीय का ? मी खाली बघितलं, अन् नाही अशी मान डोलावली. तेव्हा पवारसाहेब म्हणाले, ' अरे आपण तुझ्या मतदारसंघातून जातोयं ते बघं तुझ्या मतदारसंघातील औदूबंराच  मंदिर दिसतयं.' मी खाली बघून चकित झालो. महाराष्ट्राच्या अक्षांश-रेखांशाची, आणि महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची खडान्-खडा माहिती असणारा नेता म्हणून पवार साहेबांची ओळख आहे. " 

पवारसाहेबांनी अनेक माणसांना मदत केली. तसचं अनेक चुकीच्या माणसांना मदत केली. ती लोकं साहेबांना सोडून गेली असल्याचेही कदम यांनी नमूद केले.

पतंगराव कदम पुढे म्हणाले, " देशाच्या पंतप्रधान पदासाठी यशवंतराव चव्हाणांनंतर या राज्यातून पंतप्रधानासाठी पात्र असणारा नेता म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिले गेले, परंतु काही कारणाने ते  होऊ शकले नाहीत, ही खंत त्यांचा एक चाहता म्हणून माझ्या मनात आहे . "

गणपतराव देशमुख यांच्याबद्दल बोलताना पतंगराव कदम म्हणाले, "आमच्या भारती विद्यापीठाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला.  खरं म्हणजे तो आमचा गैरव आहे . इतके गणपतराव आबा  मोठे आहेत. त्यांच्याकडून सगळ्या तरूण आमदारांनी निष्टा म्हणजे काय असते ते शिकावे . "

संबंधित लेख