जावई माझा भला : पतंगरावांचे जावई राजेंद्र जगताप यांना पुन्हा पुण्यात पोस्टिंग

जावई माझा भला : पतंगरावांचे जावई राजेंद्र जगताप यांना पुन्हा पुण्यात पोस्टिंग

पुणे : माजी मंत्री पतंगराव कदम यांचे जावई राजेंद्र जगताप हे पुन्हा पुण्यात पोस्टिंग मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने आज नियुक्ती केली.

जगताप यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार जवळपास चार वर्षे कारभार सांभाळला होता. जगताप यांचे केडर खरे तर संरक्षण विभागांतर्गत येणाऱया कॅन्टोन्मेंट बोर्ड सेवेचे आहे. या सेवेतील अधिकारी महापालिकांत सहसा प्रतिनियुक्तीवर येत नाहीत. जगताप हे त्याला अपवाद ठरले. तत्कालीन आघाडी सरकारने त्यांची ही नियुक्ती केली होती. तेव्हा पतंगराव हे राज्यात मंत्री होते. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याने त्यास आक्षेप घेतला नाही. मात्र इतर अधिकाऱ्यांत नाराजी होती.  आता भाजप-शिवसेनेचे सरकार असतानाही जगताप यांची स्मार्ट सिटीच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर वर्णी लागली आहे.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे या आधी ही जबाबदारी होती. मात्र तेथून त्यांना हटविण्यात आले होते. त्यांच्याऐवजी सैनी यांच्याकडे या पदाचा कार्यभार होता. सैनी यांनी पदभार घेण्यापूर्वीच त्यांची बदली झाली. त्यानंतर अतिरिक्त आय़ुक्त अपर्णा देशभ्रतार यांच्याकडे स्मार्ट सिटीची जबाबदारी आली. त्यांना दूर करून जगताप यांच्याकडे या पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. केंद्र सरकार आणि पालिका यांच्यात समन्वय ठेवणे, या प्रकल्पांतर्गत येणाऱया कामांचे आखणी, नियोजन याची सूत्रे जगताप यांच्याकडे येतील.

कॅन्टोन्मेंट सेवेत असतानाही त्यांच्याकडे पुण्याजवळ असलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद होते. तेथून ते पालिकेत आले. गेली सहा-सात वर्षे ते पुण्यातच आहेत. इतर सेवांतील अधिकारी पाच वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर येऊ शकतात. राज्य सरकारने जगताप पाच अधिक आणखी दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. राजेंद्र यांचे वडील चंदुकाका जगताप हे काॅंग्रेसचे माजी आमदार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com