महादेवराव महाडीकांनी सन्मानाने कॉंग्रेसमध्ये यावे: पतंगराव कदम 

महादेवराव महाडीकांनी सन्मानाने कॉंग्रेसमध्ये यावे: पतंगराव कदम 

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी चूक केली नसती तर ते बिनविरोध आमदार झाले असते, असे सांगतानाच कॉंग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी श्री. महाडीक यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये सन्मानाने यावे, असे जाहीर आवाहन थेट आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात करून एकच खळबळ उडवून दिली. 

डॉ. कदम हे बोलत असतानाच व्यासपाठीवरून श्री. पाटील यांनी "ते तेवढे नकोत' असे सांगितल्यानंतर उपस्थितांनीही महाडीक नकोच असा नारा दिला. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज राजोपाध्येनगर येथे कॉंग्रेसची जाहीर सभा झाली. सभेत आपल्या खुल्लमखुल्ला भाषणासाठी प्रसिध्द असलेल्या डॉ. कदम यांनी याही सभेत आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करून एकच खळबळ उडवून दिली. 
डॉ. कदम म्हणाले,"महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर होती. श्री. महाडीक यांना कॉंग्रेस कमिटीत बोलवले. त्यांनी इतरांना सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला, आम्ही त्याला विरोध केला. नंतर त्यांनी निम्म्या जागा मागितल्या, पण ते आम्ही मान्य केले नाही. मग ते विरोधात जाऊन लढणार म्हणाले. त्यांना आम्ही तुमच्या पध्दतीने लढा, कॉंग्रेस आपल्या पध्दतीने लढेल असे सांगितले.' 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना दिल्लीत एक बातमी उठली. पाच खासदार आणि 25 आमदार निवडून आणणाऱ्याला उमेदवारी द्या असा त्याचा आशय होता. पण स्थानिक पातळीवर याची माहिती घेण्याचा आग्रह मी धरला. मोहन प्रकाश यांच्याकडे तसा आग्रह धरला आणि उमेदवारीचा तिडा सुटल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. 

डॉ. कदम म्हणाले,"सरकारच्या अमिषाला लोक बळी पडले पण त्यांना आता कळून चुकले आहे. परिवर्तनाची सुरूवात झाली आहे, अशोक चव्हाण यांनी त्यांची सुरूवात नांदेडमधून केली आहे. पण तरीही पळापळी सुरू आहे ती थांबवा, माजी आमदार महादेवराव महाडीक यांनाही सन्मानाने बोलवा, त्यांनीही सन्मानाने कॉंग्रेसमध्ये यावे.' 

तरीही मी आमदार, मंत्री 
दिल्लीत कॉंग्रेसमध्ये काय चालते हे काय कळायला मार्ग नाही. वारंवार मला याचा अनुभव आला पण दिल्लीत काही चालू देत मी मात्र 20 वर्षे मंत्री आणि 33 वर्षे आमदार राहीलो एवढे मात्र कळाले, असा टोला डॉ. कदम यांनी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com