patan band | Sarkarnama

रोहनच्या मृत्युच्या निषेधार्थ कऱ्हाड-चिपळुण मार्गावर रास्तारोको, पाटण तालुका बंद

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

पाटण : कोपर खैरणे येथे मराठा समाजाचे आंदोलनात सहभागी झालेल्या रोहन तोडकर याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर तालुक्‍यातील खोनोली या त्याच्या मुळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचेवतीने आज (शनिवारी) संपुर्ण पाटण तालुका बंद ठेऊन त्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्‍यातील बाजारपेठा, वडाप वहातुक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पाटण येथे लायब्ररी चौक येथे श्रद्धांजली वहाण्यात आली., नवारस्ता याठिकाणी ठिय्या आंदोलन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पाटण : कोपर खैरणे येथे मराठा समाजाचे आंदोलनात सहभागी झालेल्या रोहन तोडकर याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर तालुक्‍यातील खोनोली या त्याच्या मुळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचेवतीने आज (शनिवारी) संपुर्ण पाटण तालुका बंद ठेऊन त्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्‍यातील बाजारपेठा, वडाप वहातुक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पाटण येथे लायब्ररी चौक येथे श्रद्धांजली वहाण्यात आली., नवारस्ता याठिकाणी ठिय्या आंदोलन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बंद मुळे सगळीकडे शुकशुकाट पहावयास मिळत होता. बंदच्या पार्श्वभुमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 
निसरे फाट्यावर अडवला राज्यमार्ग 
तोडकर या युवकाच्या मृत्युप्रकरणी आज कऱ्हाड-चिपळुण राज्यमार्ग निसरे फाटा येथे आडवण्यात आला. संबंधित घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी समस्त मराठा समाजाने सकाळी अकरापासून हा राज्यमार्ग रोखुन धरला आहे. त्यामुळे कऱ्हाड-चिपळुण मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख