इराणकडून तेल विकत घेणार आणि तेलाच्या बदल्यात सोयाबीनची पेंड देणार !

शेतकऱ्यांनी सोयाबीन घालण्याचे थोड थांबावं.
इराणकडून तेल विकत घेणार आणि तेलाच्या बदल्यात सोयाबीनची पेंड देणार !

कऱ्हाड : सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबरमध्ये चीनचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेने तंबी दिली असली तरी इराणकडुन आम्ही तेल विकत घेणार आहोत. तेलाच्या बदल्यात इराणला सोयाबीनची पेंड घालण्याची कार्यवाही सुरु आहे. चीन आणि इराणला एकदा का पेंड निर्यात होऊ लागली की सोयाबीनचे भाव गगनाला भिडतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घालण्याचे थोड थांबावं, असे आवाहन राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना येथे केले. 

कऱ्हाड (जि.सातारा) येथे दौऱ्यावर आल्यावर पाशा पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

पटेल म्हणाले, दरवर्षी पिक आलं की सण येतो आणि भाव पडतो, यंदा मात्र पिक आलेत, सण आलाय आणि भाव वाढायला सुरुवात झाली आहे. हे घडण्यासाठी आम्हाला वर्षभर मेहनत घ्यावी लागली. सोयाबीनमधुन शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावे यासाठी ते बाहेरच्या देशात निर्यात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चीनचे शिष्टमंडळ डिसेंबरमध्ये भारतात येणार आहे. त्यांच्याशी करार करुन त्यांना सोयाबीन, पेंड निर्यात करण्यात येईल. चीन ही भारतासाठी पेंडेंची मोठी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर अमेरीकेने निर्बंध घातले असले तरीही इराणकडुन भारत तेल खरेदी करणार आहे. इराणकडुन ते घेऊन त्याबदल्यात त्यांना सोयाबीनची पेंड देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सोयाबीनचे दर गगनाला भिडतील आणि शेतकऱ्यांनी घाम गाळुन पिकवलेल्या सोयाबीनला सोन्याचे दिवस येतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com