parth ajit pawar starts politicle marathon | Sarkarnama

पार्थ अजित पवार यांची मावळात राजकीय दौड

दीपक कांबळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे :  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय दौडीची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

लोणावळा शहर राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. पार्थ यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत धावून भाग घेतला. यात बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, यासह अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. 

पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार असल्याचे बोलण्यात येते. शरद पवार यांनी मावळातून पवार कुटुंबाचा कोणीच सदस्य उभा राहणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी पार्थ यांच्या मावळातील फेऱ्या थांबलेल्या नाहीत.

अजित पवार यांच्यासोबत पार्थ यांनी चिंचवडमध्येही जाहीर कार्यक्रमांना गेल्या काही दिवसांत उपस्थिती लावली. ते व्यासपीठावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या  गेल्या. दुसरीकडे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्यासोबत पार्थ यांचेही फ्लेक्स फलक लागले आहेत. त्यामुळेच पार्थ हे मावळातूनच राजकीय दौड सुरू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा थांबलेली नाही.
 
संबंधित लेख