parner bajar samiti meeting about prashant gaikwad | Sarkarnama

प्रशांत गायकवाड यांच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

गायकवाड यांना मानणारे सात संचालक गैरहजर राहिले.

पारनेर (जि. नगर)  : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या सह्यांचे अधिकार काढावेत, यासाठी आज संचालकांची बैठक उपसभापती विलास झावरे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी गायकवाड यांना मानणारे सात संचालक गैरहजर राहिले. विरोधाकांचे १४ पैकी ११ संचालक उपस्थीत राहिले, मात्र सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ११ विरूद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला.

सह्यांचे अधिकार काढवेत, अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे आठ, काँग्रेसचे एक व शिवसेनेचे पाच अशा १४ संचालकांनी केली होती. आज त्यांचे १४  संचालक उपस्थीत राहिले व सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर झाला.

ही बैठक अनधिकृत असल्याचे पत्र तज्ज्ञ संचालक वसंत चेडे व संभाजी आमले यांनी आजच्या सभेच्या अध्यक्षांना दिले आहे. बैठकीचा अजिंठा अवघ्या तीन दिवसाची मुदत देऊन काढला व सभापती चांगले काम करत असतानाही केवळ राजकिय हेतूने हा ठराव घेण्यात आसल्याचे त्यात म्हटले आहे.

आता गायकवाड यांच्याकडे सात, तर सुजित झावरे गटाकडे त्यांचे सात एक काँग्रसचा व तीन शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे असे ११ सदस्य उरले आहेत. मात्र यापुर्वीच सभापती गायकवाड यांच्या विरोधात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर बाजार समितीच्या १२ संचालकांच्या सह्या व सोबत प्रतीज्ञापत्र जोडले आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेस आठ, काँग्रेसचे विद्यमान उपसभापती विलास झावरे यांच्यासह शिवसेनेच्या तीन संचालकांचा समावेश आहे. मात्र यातील एक संचालक गायकवाड यांच्या गळाला लागल्याने झावरे यांच्याकडे ११ संचालक उरले आहेत. आता अविश्वासचा ठराव मंजूरीसाठी १२ संचालकांची गरज आहे. त्यामुळे आता अविश्वासचा ठराव मंजूर होणार की बरगळणार, याची उत्सुकता लागली आहे.
अ 

संबंधित लेख