parliament houses works distrubed | Sarkarnama

राफेलवरून लोकसभेत, तर कावेरी मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जानेवारी 2019

राफेलच्या मुद्द्यावरून लोकसभेचे, तर कावेरी प्रश्नाच्या मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज आज गोंधळातच सुरू झाले. दोन्ही सभागृहांचे काम 12 वाजपर्यंत तहकूब करण्यात आले होते. पुन्हा दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले मात्र गोंधळ सुरूच आहे. 

पुणे : राफेलच्या मुद्द्यावरून लोकसभेचे, तर कावेरी प्रश्नाच्या मुद्द्यावरून राज्यसभेचे कामकाज आज गोंधळातच सुरू झाले. दोन्ही सभागृहांचे काम 12 वाजपर्यंत तहकूब करण्यात आले होते. पुन्हा दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले मात्र गोंधळ सुरूच आहे. 

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभेमध्ये राफेलच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राफेल मुद्यावरच होणाऱ्या चर्चेदरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुपारी दोन वाजता लोकसभेत बोलण्याची शक्यता आहे. 

राज्यसभेतही कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. एआयएडीएमकेच्या खासदारांनी कावेरीच्या मुद्दावर सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यसभेचेही कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज ट्रिपल तलाक बिल राज्यसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. 

संबंधित लेख