इंदापुरात आघाडी धर्म पाळणार : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी येताच गारटकरांचा हर्षवर्धन यांना दिलासा

आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील प्रदीप गारटकर यांची जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती केली. इंदापूर विधानसभेची जागा कोणाला मिळणार, यावरून दोन्ही काॅंग्रेसमध्ये वाद पेटलेला असतानाच गारटकर यांनी इंदापुरात आघाडीचा धर्म पाळणार असल्याची घोषणा करून आपले परंपरागत विरोधक काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिलासा दिला आहे.
pradip-garatkar.
pradip-garatkar.

प्रश्न : जिल्हामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष वाढीसाठी तुम्ही काय योजना तयार केल्या आहेत ?
उत्तर : जिल्हामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष वाढीसाठी वन बुथ २५ युथ ही संकल्पना राबविणार आहे. यामध्ये एका बुथवरती २५ नागरिकांना घेण्यात येणार आहे.यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असणार आहे.तसेच युवा वर्गाना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार असून जास्तीजास्त नागरिकांपर्यत पक्षाची धैय्य,धोरणे पोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

प्रश्न : आगामी लोकसभा विधानसभा निवडकुणीसंदर्भात आपली  भूमिका काय असणार आहे ?
उत्तर :  पुणे जिल्हातील सर्वसामान्य जनता ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारसरणीची आहे.  मात्र पक्षामध्ये अंतर्गत गट-तट असल्याचा फायदा दुसऱ्या पक्षाला होत होता. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या,पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रय बैठाक घेवून त्यांच्या अडचणी जाणून गट-तट संपविण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

प्रश्न :  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा पुणे हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षाला जिल्हामध्ये तीन जांगावरती समाधान मानावे लागले होते.यावेळची परस्थिती कशी असून शकेल ? 
उत्तर : पुणे जिल्हाविषयी बोलायचे झाले तर, पुणे जिल्हा हा प्रगतशिल शेतकऱ्यांचा, उद्योजकांचा, व्यापाऱ्यांचा  जिल्हा आहे . गेल्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची लाट होती.याचा फटका पक्षाला ही बसला होता. या लाटेमुळे सर्वसामान्य,शेतकरी वर्गाचा फार मोठ्या प्रमाणात तोटा झाला असुन जनतेने फार मोठी किंमत मोजली आहे. नोटाबंदी,जीएसटी मुळे  ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. बाजारपेठा ओस पडल्या. शेतमालाचे भाव कोसळले. महागाईचा आगडोंब उसळला आहे. ही सर्व परस्थिती सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवली आहे. येणाऱ्या निवडणूकापूर्वी पक्षाचे संघटन मजवूत करुन हेवेदावे बाजुला ठेवून जिल्हामध्ये जास्तीजास्त आमदार निवडूण आणल्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रश्न :  इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस - कॉग्रेस पक्षाची आघाडी हाेणार का ?
उत्तर : राष्ट्रवादी कॉग्रेस - कॉग्रेस पक्षाच्या आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षाचे अध्यक्ष,प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी घेतील. मात्र तालुक्यामध्ये आघाडीचा धर्म पाळला जाईल. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे बळकट करण्यात येणार आहे. मी ही तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. निवडीनंतर अनेक जुने कार्यकर्ते भेटायला येत असून त्यांना आनंद झाला आहे. आनंदाचे रुपांतर पक्ष वाढीसाठी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com