parbhani zp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

परभणीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा पराभव

सरकारनामा न्यूज ब्युरो 
मंगळवार, 4 एप्रिल 2017

परभणी ः जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने 34 विरुद्ध 13 असा शिवसेनेचा पराभव केला. सेलू, गंगाखेड, पूर्णा या तालुक्‍यांना सभापतिपदे मिळाली असून पाठिंब्याच्या बदल्यात भाजपला एका सभापतिपदाची लॉटरी लागली आहे. तर सुरवातीपासून बुचकळ्यात पडलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा दिला आहे. सोमवारी झालेल्या विषय समित्यांच्या निवडीच्या वेळी तिन्ही आमदारांसह संपूर्ण राष्ट्रवादी आणि भाजपची फौज जिल्हा परिषदेत दिवसभर ठाण मांडून होती. 

येथील जिल्हा परिषदेच्या बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात दुपारी तीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. महिला व बाल विकास सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या नरवाडी (ता. सोनपेठ) येथील सदस्या राधाबाई सूर्यवंशी आणि शिवसेनेच्या अंजली आणेराव यांचे अर्ज आले होते. त्यात सूर्यवंशी यांनी बाजी मारली आहे. त्यांना 34 तर आणेराव 13 यांना मते पडली. समाजकल्याण विभागासाठी राष्ट्रवादीच्या गौर (ता. पूर्णा) येथील उर्मिला बनसोडे व दगडुबाई तिथे या दोघींचे तर शिवसेनेकडून स्नेहा रोहिणकर, रासपकडून राजेश फड यांनी अर्ज दाखल केले होते. अखेर अर्ज मागे घेण्याच्या वेळेत श्री. फड, श्रीमती तिथे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने श्रीमती बनसोडे व श्रीमती रोहिणकर यांच्यात हात उंचावून घेतलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीमती बनसोडे यांना 34 तर श्रीमती रोहिणकर केवळ 13 मते पडली. उर्वरित विषय समित्यांसाठी राष्ट्रवादीकडून कुपटा (ता. सेलू) येथील अशोक काकडे, भाजपकडून राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील श्रीनिवास मुंडे, शिवसेनेकडून प्रभाकर चापके, वसुंधरा घुंबरे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात काकडे व मुंडे यांना प्रत्येकी 34 आणि शिवसेनेच्या उमेदवारांना 13 मते पडली. पाठिंबा देण्याचा बदल्यात भाजपच्या श्रीनिवास मुंडे यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद देण्यात आले आहे. आता केवळ शिक्षण, बांधकाम, आरोग्य या विभागांचे खाते वाटप राहिले असून 21 एप्रिलच्या आत वाटप केले जाणार आहे. 

शिक्षण सभापतिपदासाठी उपाध्यक्षा भावना नखाते या इच्छुक असून असे झाल्यास बांधकाम व आरोग्य ही पदे श्री. काकडे यांच्या कडे जाणार आहेत. निवडीच्या वेळी सभागृहात राष्ट्रवादीचे 24, भाजपचे 5 रासपचे 3, अपक्ष 2 असे एकूण 34 तर शिवसेनेचे 13 सदस्य उपस्थित होते. तसेच एक अपक्ष आणि कॉंग्रेसचे सहा असे एकूण सात सदस्य गैरहजर राहिले. निवड होताच राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नूतन सभापतींचे स्वागत केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादीला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी एक पद हे भाजपलाच मिळणार हे निश्‍चित होते. त्यानुसार भाजपच्या वतीने श्रीनिवास मुंडे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, आमदार डॉ. मधुसूदन केंदे, भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, गणेशराव रोकडे, अनिल नखाते आदी या वेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख