parbhani politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आता उत्कंठा परभणी जिल्हा परिषद अध्यक्षांची 

राजाभाऊ नगरकर : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवड झाल्याने आता परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उत्कंठा लागली आहे. 
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. आमदार विजय भांबळे ज्याच्या नावाला हिरवा कंदील दाखवतील त्या सदस्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. 

परभणी : पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवड झाल्याने आता परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उत्कंठा लागली आहे. 
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. आमदार विजय भांबळे ज्याच्या नावाला हिरवा कंदील दाखवतील त्या सदस्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. ओबीसी प्रवर्गातील मीना नानासाहेब राऊत, उज्वला राठोड, इंदूबाई घुगे, नमिता बुधवंत, अरुणा काळे या सदस्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आल्या असून त्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांचे समर्थक, नातेवाईक आपापल्या परीने आमदार भांबळे यांच्याकडे फिल्डिंग लावत आहेत. अद्याप कोणाच्या नावाला दुजोरा मिळाला नसला तरी उज्वला राठोड, मीनाताई राऊत यांची नावे चर्चेत पुढे आहेत. 

उज्वला राठोड बंजारा समाजाच्या असून गेल्या दोन निवडणुकांपासून जिल्हा परिषदेत वाघी धानोरा गटाचे नेतृत्व करीत आहेत. पक्ष कार्याप्रमाणेच विकास कार्यामुळे
त्यांचा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. त्यांचे पती विश्वनाथ राठोड आमदार भांबळे यांचे विश्वासू समजले जातात. राठोड यांची प्रतिमा चांगली असून त्यांना संधी मिळाल्यास बंजारा समाजास न्याय मिळेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेला बंजारा समाज एकत्र आणण्यास मदत होऊ शकेल, असे राष्ट्रवादीतील एका गटाला वाटते. 

मीनाताई राऊतही आमदार भांबळे यांच्या कट्टर समर्थक समजल्या जातात. त्या माळी समाजाच्या असून गेल्या दहा वर्षांपासून चारठाणा गटाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचाही कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेत सभापतिपद भूषविले असल्याने त्यांना संस्थेच्या कारभाराचा अनुभव आहे. त्यांचे पती नानासाहेब राऊत हे भांबळे यांच्या राजकारणाच्या सुरवातीपासून त्यांच्यासोबत आहेत. श्रीमती राऊत यांच्या माध्यमातून माळी समाजाला संधी मिळावी, अशी या समाजाची अपेक्षा आहे. 

इंदूबाई घुगे, नमिता बुधवंत, अरुणा काळे या वंजारी समाजाच्या असून या समाजाला मागच्यावेळी मीनाताई बुधवंत यांच्या माध्यमातून अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. असे असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते. त्यानुसार आमदार भांबळे त्यांच्या पुढील राजकारणाचा विचार करून कोणाला जिल्हा परिषदेच्या कारभाराची संधी देतात यासाठी काही दिवस थांबावे लागेल. 

संबंधित लेख