परभणीच्या महापौरांची निवड 15 मे पूर्वी होणार 

परभणीच्या महापौरांची निवड 15 मे पूर्वी होणार 


परभणी : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौरपदाच्या निवडीसाठी 15 मे ही डेडलाईन असून 16 मेपासून महापालिकेची जबाबदारी नव्या कारभाऱ्यांवर राहणार आहे. दरम्यान निवडीसंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने पाठविला असून आता महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली असून कॉंग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाची निवड 2012 मध्ये 16 मे रोजी झाली होती. त्यापूर्वी म्हणजे ता. 15 मे 2017 पर्यंत दुसऱ्या महापालिकेच्या महापौरपदाची निवड करणे अनिवार्य आहे.

महापालिकेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आली असून ती प्रसिद्ध देखील झाली आहेत. त्याचबरोबर महापौरपदाच्या निवडीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सोमवारी (ता.24 ) पाठवला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत विभागीय आयुक्त महापौरपदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी अथवा आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर नियुक्त प्राधिकृत अधिकारी हे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करतील. 
पहिल्या महापौर निवडणुकीचा इतिहास 
परभणी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाची निवड 2012 मध्ये 16 मे रोजी झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 30, कॉंग्रेसचे 23 , शिवसेनेचे आठ, भाजपचे दोन व दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रताप देशमुख व उपमहापौरपदासाठी सज्जुलाला यांनी उमेदवारी दाखल केली होती. तर कॉंग्रेसकडून महापौरपदाचे उमेदवार भगवान वाघमारे व उपमहापौरपदाचे शिवाजी भरोसे हे होते.

राष्ट्रवादीने या निवडणुकीत अपक्ष एक व भाजपचे दोन उमेदवार साथीला घेऊन 33 विरुद्ध 24 अशा नऊच्या मताधिक्‍क्‍याने ही पदे प्राप्त केली होती. शिवसेनेने त्यावेळी तटस्थतेची भूमिका घेतली होती. 
आताची परिस्थिती देखील काहीशी तशीच आहे. कॉंग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 18, शिवसेनेचे सहा, भाजपचे आठ तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले व कॉंग्रेसला बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या. त्यांना अपक्ष किंवा अन्य पक्षाची साथ घ्यावीच लागणार आहे. दोनही अपक्ष त्यांच्या गळाला लागल्याची माहिती असून कॉंग्रेसला अन्य पक्षाकडे हात पसरण्याची वेळ येणार नसल्याचे सांगण्यात येते. परंतु पक्षात देखील महापौरपदासाठी मोठी चुरस आहे. त्यामुळे व्हीप काढला जाण्याची शक्‍यता आहेच. तरी देखील दगा फटका होऊ नये म्हणून कॉंग्रेस पक्ष अन्य एखाद्या पक्षाला सोबतीला घेतो का? हे लवकरच कळेल. 
कॉंग्रेस पक्षात पदासाठी चुरस 
कॉंग्रेस पक्षात महापौरपदासंह अन्य विविध पदासाठी चुरस असली तरी या निवडणुकीतून जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांना मानणारा, त्यांच्याबरोबर कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले आहेत. काही अन्य गट आहेत, ते फक्त विविध पदांसाठी दबाबतंत्राचा वापर करू शकतात. त्यामुळे श्री. वरपुडकर म्हणतील तोच महापौर होण्याची शक्‍यता आहे. तर अन्य गटा-तटामध्ये उपमहापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती अशी विविध पदे देण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com