लोकसभेसाठी परभणीतून राष्ट्रवादीतर्फे राजेश विटेकर, जयंत पाटलांची घोषणा 

लोकसभेसाठी परभणीतून राष्ट्रवादीतर्फे राजेश विटेकर, जयंत पाटलांची घोषणा 

जालना : लोकसभेसाठी मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कॉंग्रेस सोबत होणाऱ्या चर्चेनंतर परभणीतून राजेश विटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्या,असे आवाहन जयंत पाटील यांनी जालन्यातील घनसावंगीच्या सभेत केली. घनसावंगी या विधानसभा मतदार संघाचा परभणी लोकसभा मतदार संघात समावेश होतो. या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून 2014 च्या निवडणुकीत विजय भांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

कॉंग्रेस सोबत होणाऱ्या चर्चेनंतर परभणी जिल्ह्यातील पक्षाचा तरुण चेहरा असलेल्या विटेकर यांना उमेदवारी देणार असून उमेदवारीसाठी त्यांच्या नावावर पक्षाकडून शिक्का मोर्तब झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com