parbhani and kranti morcha | Sarkarnama

परभणी जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

परभणी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (24) पुकारण्यात आलेल्या बंदला परभणी चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह काही तालुक्‍यात छोट्या मोठ्या घटनामुळे बंदला हिंसक वळण लागले. संचखंड एक्‍सप्रेससह अन्य दोन रेल्वे गाड्या तब्बल अर्धातास स्थानकात आंदोलकांनी रोखून धरल्या. मराठा क्रांती मोर्चा कडून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला परभणी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

मोठ्या शहरासह लहान गावातही दिवसभर एकही दुकान उघडले नाही. परभणी रेल्वे स्थानकात सकाळी 10 ते 11 या दरम्यान आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या देत औरंगाबादकडे जाणारी पॅंसेजर गाडी, आदीलाबाद-परळीसह नांदेड-अमृतसर ही सचखंड एक्‍सप्रेस रेल्वेगाडी रोखून धरली. बंद दरम्यान शहरात किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. रेल्वेस्टेशन रस्त्यावर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे तीन पुरुषासह दोन महिला देखील किरकोळ जखमी झाल्या. आंदोलनातील युवकांनी वर्तमानपत्रांच्या कार्यालयावर दगडफेक केली. पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सेलु, जिंतूर तालुक्‍यात रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यातून मंगळवारी एकही बस धावली नाही. 

संबंधित लेख