parbhani | Sarkarnama

परभणीच्या महापौरपदी मीना वरपुडकर, उपमहापौरपदी सय्यद समी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मे 2017

परभणी : परभणी महापालिकेच्या महापौरपदी मीना वरपुडकर यांची तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांची मंगळवारी निवड झाली. परभणी महापालिकेच्या महापौर पदासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती. परभणी महापालिकेतील 16 प्रभागांतील 65 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान झाले होते. त्यामध्ये 31जागा जिंकून कॉंग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18 , भारतीय जनता पक्षाने आठ, शिवसेनेने सहा तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या होत्या. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी महापौरपदासाठी कॉंग्रेसकडून मीना वरपुडकर व खान मुनसीफ नय्यर यांनी, भाजपकडून संतोषी देवकर यांनी तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष नगरसेविका शेख अलिया अंजुम मोहंमद गौस यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसच्या सय्यद समी सय्यद साहेबजान, भगवान वाघमारे, गुलमीरखान कलंदरखान, भाजपकडून डॉ. विद्या पाटील, रंजनाबाई सांगळे तर शिवसेनेकडून प्रशांत ठाकूर यांनी अर्ज दाखल केले होते. 

महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहात झालेल्या सभेत कॉंग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार मीना सुरेश वरपुडकर यांना 40 मते पडली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेख आलिया अंजूम यांना केवळ 19 मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे पाच तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे सय्यद समी उर्फ माजूलाला व भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांचे उमेदवारी अर्ज होते. यात उपमहापौर पदासाठी माजू लाला यांना 32 मते मिळाली तर भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ आठ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले. 

संबंधित लेख